नांदगांव : मारुती जगधने
पांझण (धोटाणे) ता नांदगाव येथील ग्रांमपंचायतीने गावातील महीलासाठी बांधलेले पण चांगल्या स्थितीत आसलेले शौचालय अचानक पणे जेसीबी च्या हातोड्याने तोडले या घटनेमुळे महिलावर्गातुन संताप जनक प्रतिक्रिया उमटल्या आता महिलांना सार्वजनिक वापराला शौचालय नाही.
ग्रामपंचायत प्रशासनाने दि २५ जानेवारी महिला शौचालयाचे ६ युनिट अचानक जमिन दोस्त केले त्यानंतर सदस्यांना नोटीस बजावून दि २९ जानेवारी रोजी शौचालय निर्लेखीत करणे बाबात बैठक बोलवली आहे .
प्रशासनाच्या या कारभाराची महिलांनी तिव्र संताप व नाराजी व्यक्त केली.
या बाबात चे वृत्त असे की पांझणदेव येथील ग्रांमपंचायतीचा प्रशासनाने कोणाताही समाज हिताचा विचार न करता शौचालयाचे सहा युनिट २५जानेवारी २०२४ ला सकाळी साडेअकराच्या दरम्यान जेसीबीच्या साह्याने ग्रा.पंचायतीने अचानक का? पाडले हे कळत नाही.तसेच गावात पर्यायी सार्वजनिक महिला शौचालयाची व्यवस्था नाही.खुद विरोधी ग्रामपंचायत सदस्यांना ही कळेना. हे सहा युनिट पाडण्यासाठी कुठेही सुचना नाही नोटीस प्रसिद्ध नाही. वैयक्तीक शौचालय नसलेल्या महिलांना पर्यायी सुलभ शौचालयाची व्यवस्था ग्रामपंचायत ने त्वरीत करून द्यावी अशी खंत महिला करत आहे. आणि पाडलेल्या सहा युनिट डबरचे जाहीर लिलाव त्वरीत करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ग्रांमपंचायतीच्या आले मना तेथे महिला भगीनींचे काही एक चालेना
सार्वजनिक शौचालय पाडल्याने महिलावर्गाची कुचंबना होत असल्याची चर्चा उमटली.

शालेय शिक्षण विभागा आयोजित स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूल प्रथम
मनमाड:- महाराष्ट्र शासनाच्या, शालेय शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक तर्फे आयोजित 'मुख्यमंत्री माझी...