मनमाड महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्या वतीने मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.वाजता महाविद्यालयामध्ये करण्यात आलेले आहे सदर कार्यशाळेसाठी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या विश्वस्त माननीय डॉ. श्रीमती संपदा दीदी हिरे या उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच सदर कार्यशाळेसाठी प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून सिम्बॉयसिस विद्यापीठ पुणे येथील प्राध्यापिका हेमांगी कडलक, लासलगाव महाविद्यालयातील डॉ. सोमनाथ आरोटे व एम. एस.जी. महविद्यालय मालेगाव येथील डॉ. सतीश अहिरे आणि महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड.शशी हिरे हे याप्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनींनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ.सुभाष निकम सर यांनी केले.
नाशिक जिल्हा स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचा संघ विजयी
मनमाड:- क्रिडा व युवकसेवा संचालनालय पुणे, महाराष्ट्र राज्य, अंतर्गत तसेच जिल्हा क्रीडा परिषद व...











