loader image

के आर टी शाळेत महात्मा गांधी यांना अभिवादन

Jan 31, 2024




मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर हायस्कुल वं ज्युनियर कॉलेज मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दिपक व्यवहारे आणि उपस्थित उपप्राचार्य श्री. वैभव कुलकणी, व संस्थेचे विश्वस्त श्री. धनंजय निंभोरकर यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता दुसरी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. ओम शुक्ला, सार्थक रावतोळे, रागिनी कुशवाह आणि स्नेहा सानप या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींनी केलेले कार्य व इंग्रजांविरूध्द केलेला लढा, आंदोलने तसेच अहिंसावादी धोरण अशा विविध मुद्दयांवर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन साई गायकवाड याने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सौ. अनिता शाकाव्दिपी व सौ. ऋचा शिंपी यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.