loader image

ध्येय साध्य करण्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज – डॉक्टर संपदा हिरे

Jan 31, 2024


मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड व राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने”क्षमता निर्माण व व्यक्तिमत्व विकास राष्ट्रीय कार्यशाळा”(capacity building & personality development program) या एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन मनमाड महाविद्यालयात करण्यात आले होते कार्यशाळेचे उद्घाटन प्रमुख अतिथी डॉ.संपदा हिरे (विश्वस्त, महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती नाशिक, मधुरा महिला सशक्तिकरण व वेल्फेअर ट्रस्ट नाशिक) यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना जीवनात जे ध्येय निश्चित केले आहे ते साध्य करण्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज आहे, ध्येय साध्य करत असताना वाचन,थोर व्यक्तींचे विचार त्यांचे अनुभव यांचा उपयोग करून घेतला पाहिजे त्यातून यश नक्कीच मिळते तसेच आयुष्यात कायम जागृत राहिले पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना केले. कार्यशाळेची सुरुवात भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा देशभक्तांना हुतात्मा दिनानिमित्ताने श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय कार्यशाळेचे समन्वयक डॉ.गणेश गांगुर्डे यांनी आपल्या प्रास्तविकेतून राष्ट्रीय कार्यशाळेच्या आयोजनाचा उद्देश विद्यार्थिनी समोर स्पष्ट केला व महिला सबलीकरणासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यमातून देशभरात वेगवेगळे उपक्रम राबवले जातात यांची माहिती दिली. तसेच महिला सक्षम झाल्यास देश सक्षम होण्यास मदत होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना नवनिर्मितीची क्षमता फक्त महिलांमध्येच असते या क्षमतेच्या आधारे मुलींनी समाजात आपला वेगळा आदर्श निर्माण करावा तसेच मोबाईलचा वापर कमी करण्याचा सल्ला देखील त्यांनी विद्यार्थिनींना दिला. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात डॉ. सोमनाथ आरोटे (लासलगाव महाविद्यालय)यांनी विद्यार्थिनींना करिअर ही संकल्पना पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून समजावून सांगितली. तसेच करिअर निवडतांना आपलं ध्येय निवडणे हे महत्त्वाचे आहे. तसेच मुलाखत, देतांना तयारी कशी केली गेली पाहिजे याविषयी सखोल असे मार्गदर्शन याप्रसंगी उपस्थित विद्यार्थिनींना केले. तसेच द्वितीय सत्रामध्ये डॉ. हेमांगी कडलग (symbiosis deemed University Pune) यांनी संप्रेषण कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, ताण तणावाचे योग्य व्यवस्थापन याविषयी प्रात्यक्षिकांसह या संकल्पना विद्यार्थिनींना समजावून सांगितल्या. राष्ट्रीय कार्यशाळेच्या तृतीय सत्रांमध्ये डॉ. सतीश अहिरे (म.स.गा महाविद्यालय, मालेगाव कॅम्प) यांनी इंटरनेट वापराचे फायदे विद्यार्थिनींना समजून सांगितले तसेच इंटरनेट बँकिंगच्या सुविधा व तोटे विद्यार्थिनींना पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या आधारे समजावून सांगितल्या.जी मेलचा वापर करत असताना कोणती दक्षता घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.तसेच चतुर्थ व अंतिम सत्रामध्ये डॉ. ज्ञानेश्वर पवार (सिडको महाविद्यालय,नाशिक) यांनी सायबर क्राईम, सायबर सुरक्षा व सायबर कायदे या विषयावर बहुमोल असे मार्गदर्शन प्रात्यक्षिकांसह दाखविण्यात आले. सामाजिक प्रसार माध्यमांचा वापर करतांना योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे या राष्ट्रीय कार्यशाळेप्रसंगी 375 विद्यार्थिनींनी सक्रीय सहभाग घेतला. याप्रसंगी महाविद्यालय विकास समिती सदस्य अलकाताई शिंदे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, महिला विकास समिती अध्यक्ष श्रीमती कविता काखंडकी, सर्व प्राध्यापक,कार्यालयीन कुलसचिव समाधान केदारे सर्व प्रशासकीय पदाधिकारी सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आरती छाजेड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. जनार्दन गावित यांनी मानाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या व एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.