नांदगांव: मारुती जगधने तालुक्यात दुष्काळ जाहीर असल्याने नागरीकाना हाताला काम नाही, पिण्यासाठी व वापराला पाणी नाही या साठी रोजगार उपलब्ध करुन देणे, पाणी पुरवठा सुरळीत करणे, यासह नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समिती कार्यालयावर दि ३० जानेवारी रोजी ढोल बजाव आंदोलन छेडुन शासनाचे लक्ष वेधण्याचे काम केले.
तालुक्यातील विविध विकास कामे,विविध योजनांचे कामे,टँकरणे होणारा पाणी पुरवठा या संदर्भात सविस्तर माहिती मिळणे बाबत् नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर झाला असून तालुक्यात भिषण पाणी टंचाई आहे ,पाणी टँकरला जिपीएस प्रणाली बसवावी, टँकरचे रजिस्टर मेंटेन होते कि नाही,जनावरांचे गोठे,रोहयो विहीरी,ग्रामपातळीवरील अंतर्गत रस्ते,घरकुल, रोहयोची कामे या संदर्भातील कामांची सविस्तर माहिती मिळणे व कामांची योग्यरित्या चौकशी करणे,पाणी टँकर नियमित करणे, दुष्काळी योजनांचा जनतेला लाभ मिळणे आदी विषयावार नांदगाव तालुका
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ढोल बजाव आंदोलन छेडण्यात आले या प्रसंगी बहुजन आघाडीच्या वतीने नांदगाव शहरातुन निघालेले ढोल बजाव आंदोलन थेट पंचायत समिती कार्यलयावर धडकले व तेथे मागण्यांचे निवेदन देण्यात आले .
या आंदोलनात
जिल्हा प्रमुख पुर्वविभाग
किरण मगरे,कपिल आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल बजाओ आंदोलन घेडण्यात आले या प्रसंगी सदरचे आंदोलक नांदगाव शहरातुन नविन तहसीलदार कार्यालयात पर्यंत जाऊन तेथे गटविकास अधिकारी / पंचायत समिती कार्यालयातील प्रमुख अधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले व निवेदनाची दखल घेऊन पुढील कार्यवाही करण्याची मागणी केली. ढोलबजाव आंदोलनात
बाळासाहेब बोरकर तालुका अध्यक्ष, मनोहर पाटील,प्रकाश धीवर,नाना वडघर,उमेश वडघर, संजय वडघर, अण्णा बोरकर, दीपक सातपुते, भागिनाथ शिंदे, मुक्ताराम बागुल, भाऊसाहेब अहिरे,चंद्रभान सोनवणे, नेत्रा बोरकर, रत्नाबाई सातपुते, अनिता सातपुते,कविता बोरकर अक्का बाई शिंदे, शांताबाई बोरकर, दत्तू भाऊ नाईकवाडे आदीसह आंदोलनात पुरुष व महिला यांचा सहभाग होता.

शालेय शिक्षण विभागा आयोजित स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूल प्रथम
मनमाड:- महाराष्ट्र शासनाच्या, शालेय शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक तर्फे आयोजित 'मुख्यमंत्री माझी...