loader image

नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील संदीप मोहीते या जवानास वीरमरण

Feb 1, 2024




सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील संदीप भाऊसाहेब मोहीते ( वय ३३ ) यास लेह येथे वीरमरण आले .
भारतीय लष्करातील लेह येथील १०५ इंजिनियर रेजिमेंटचा जवान संदीप भाऊसाहेब मोहिते ( वय ३३ ) राहणार मांडवड तालुका नांदगाव यांना लेह येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले. गावात राहणाऱ्या लष्करी जवानाला वीरमरण आल्याने मांडवड गावावर शोककळा पसरली आहे.
पुतण्याचे अकाली निधन झाल्याने संदीप हे मागील महिन्यात सुट्टीवर आले होते. गुरुवारी एक फेब्रुवारी रोजी त्यांनी रेजिमेंट जॉईन केली. सुटी संपवून कर्तव्यावर परतल्याच्या पहिल्याच दिवशी बर्फ हटविण्याचे काम करत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांचा लहान भाऊ श्रीकांत हा सुद्वा भारतीय लष्करात जयपूर येथे कार्यरत आहे. संदीप यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन मुले व दोन भाऊ असा परिवार आहे.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.