loader image
[ays_poll id=7]

नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

Feb 2, 2024





नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहराचा पाणी प्रश्न जटील बनत चालला असून एकाच ठिकाणी त्याच मार्गावर एकाच कारणासाठी रस्तारोको होत आहे. दि १ फेब्रुवारी रोजी नांदगाव शहरातील डाॅ आंबेडकर नगर,दत्तनगर,लक्ष लक्ष्मी नगर,ढासे मळा, धामणे मळा, या भागातील संतप्त नागरीकानी पाण्यासाठी रास्तारोको केला या वेळी आंदोलकांनी नगरपालिका मुर्दाबादच्या घोषना देत संताप व्यक्त करीत काही वेळ मालेगाव रोडवरील डाॅ बाबासाहेब प्रवेशव्दारा समोर महिला पुरुष बसून हंडानाद करुन रस्तारोको करीत होते याच आठवड्यात याच ठिकाणी दुसर्यांदा रास्तारोको झल्याने आंदोलकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या यावेळी पालिका प्रशासनाच्या कर्मचारी अधिकार्याना आंदोलक न जुमानता रास्तारोको वर ठाम होते. यावेळी न पा मुख्यधिकारी विवेक धांडे आंदोलनस्थळी उपस्थित होते. दरम्यान पो नि प्रितम चौधरी व पालिका अधिकारी, पत्रकार भगवान सोनवने यांनी मध्यस्थी केल्याने रास्तारोको मागे घेण्यात आला पाण्याच्या मागणीसाठी
महिला हंडे घेऊन हंडानाद करीत रस्त्यावर येऊन बसल्या होत्या माञ पोनि प्रितम चौधरी घटनास्थळी दाखल होताच आंदोलनातील युवा नेते कमलेश पेहेरे यांना पोलिसानी ताब्यात घेतले व रास्तारोको थांबला
दरम्यान पालिका प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत पालिका मुख्यधिकारी विवेक धांडे यांच्या दालनात पञकार परिषद घेऊन प्रशानची भुमिका स्पष्ट केली.
धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. गिरणा धरणातून महिन्याकाठी शहराला एकच पाणी आवर्तन मिळते. तसेच पर्यायी माणिकपुंज धरणातून येणाऱ्या जलवाहिनीला वारंवार लिकेजेस होत असल्याने पाणीपुरवठ्याचा कालावधी २२ दिवसांपर्यंत लांबला आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन शहरवासीयांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी केले.
येथील पाणीपुरवठ्याचा कालावधी लांबल्याने वारंवार पाण्यासाठी आंदोलने होत असून पालिका कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी धांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पाणी उपलब्धतेची आणि पालिका पाणीटंचाई टाळण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
पाणी वितरणासाठी पालिकेने नांदगांव शहरात ४४ भागांची रचना केली आहे. क्रमाने या भागांना पाणी दिले जाते. एका भागाला एकावेळी ३ लाख लिटर पाणी लागते. विविध अडचणींचा सामना करणाऱ्या गिरणा आणि माणिकपुंज धरणातून शहराला आजमितीस दिवसाला सरासरी ६ लाख लिटर पाणी मिळत असल्याने पाणीपुरवठयाचा कालावधी २२ दिवसांपर्यंत गेला आहे. निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी माणिकपुंज धरणापासून अपूर्ण अवस्थेत असलेल्या लोखंडी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी आमदार सुहास कांदे यांनी तातडीने २ कोटी निधी उपलब्ध करुन दिला आहे. काम पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून तातडीने वर्क ऑर्डर काढण्यात येणार आहे. गिरणा धरणातून महिन्याकाठी दोन आवर्तने मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी धांडे यांनी दिली.
दरम्यान ग्रामीण भागात देखील पाणी प्रश्न जटील बनला आहे .महिण्यातुन एकदाच नळाला पाणीपुरवठा होत असल्याने जनता त्रस्त झाली आहे.


अजून बातम्या वाचा..

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
.