loader image

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

Feb 2, 2024


उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ,उमराणे संचलित,मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या सात दिवसापासून सुरु असलेल्या मौजे -सांगवी या गावी आयोजित महाविद्यालयाचा ‘राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर” समारोप कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.सौ.वैशाली आहेर (सरपंच)यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की,अशा शिबिरातून विदयार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव मिळतो. त्यांना आपले जीवन जगण्यासाठी अनुभव मिळतात स्वयंम शिस्त लागते.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. खैरनार कैलास के. यांनी अध्यक्षीय भाषणात सदर शिबीराचे महत्व बाबत आपले मनोगत व्यक्त केले.राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ.आहिरे एस.डी. यांनी आपल्या प्रास्ताविकातून सात दिवस शिबिरातून केलेल्या कामाचा आढावा सादर केला.या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक,ग्रामसेवक, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन सेवक आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विदयार्थी व विदयार्थीनी उपस्थित होते. प्रा. श्रीमती देवरे एन.के.यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रीमती मवाळ एस.बी.यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
.