loader image
[ays_poll id=7]

तुम्ही खाता त्या भाकरीवर साहेबांची सही आहे र …

Feb 7, 2024




नांदगाव : मारूती जगधने एकेकाळी तार्यावर गाऊन उदरनिर्वाह करणार्या कडुबाई खरात यांना जनतेने लोकगायीका ही पदवी बहाल केली त्या कडुबाईं खरात यांचा भिमगितांचा बहादार जंगी कार्यक्रम नांदगाव नगरीत आयोजीत केला असता त्यांनी गायलेल्या मायबापाहुन भिमाचे उपकार लई हाय र… हो… तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबाहेबांची सही… हाय र …या गीताला सर्वाधिक पसंती देत प्रेक्षक मंञमुग्ध झाले होते.
नांदगाव येथील जैनधर्मशाळेच्या प्रांगणात माता रमाई भिमराव आंबेडकर जयंती उत्सव निमित्त कडूबाई खरात यांचा जंगी भिमगितांचा कार्यक्रमाचा श्रोत्यांनी मनमुराद आनंद घेतला. छञपती शाहु महाराज सोशलग्रुपच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या मधुर गीतांचा फुले, शाहु ,आंबेडकर आनुयायांनी मनसोक्त आनंद घेतला .या कार्यक्रामस आरपीआयचे नाशिकचे भुषण लोंढे ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धाञक, संतोश गुप्ता, श्रावण आढाव,देविदास मोरे, ,नितीन जाधव, महावीर जाधव, दत्तराज छाजेड,संगीता जगताप, आदीसह विविध नामवंतानी कार्यक्रामाला उपस्थिती दर्शविली राञी च्या शांत वातावरणात भिमगितांचा मनमुराद आनंद श्रोत्यांनी घेत गाणे गुणगुणत कार्यक्रामच्या समाप्ती नंतर बाहेर पडले या कार्यक्रमाला महिलांची उपस्थित लक्षणीत होती आरपीआय पदाधिकारी व छत्रपती शाहुमहाराज ग्रुपच्या वतीने विशेष परीश्रम घेतले. नांदगाव मध्ये लोकगायीका कडूबाई खरात यांचा आंबेडकरी गीतांचा कार्यक्रम प्रथमच घेण्यात आला कार्यक्रमाला उपस्थीतांनी उत्तम पसंती दिली.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
.