loader image
[ays_poll id=7]

मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

Feb 7, 2024

मनमाड : तब्बल ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाडकर जनतेचे स्वप्न पूर्ण होत असून आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आले.संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या मंगलदिनी बुधवारी (ता.७) दुपारी १२ ला साजरा होणार आहे. यानिमित्त आंबेडकरी अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याने मनमाड शहर निळेमय झाले आहे.

शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बसवलेल्या अर्धाकृती पुतळ्याला ५९ वर्ष झाले आहे. मनमाड शहर हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र राहिल्याने गेल्या ४० वर्षापासून पूर्णाकृती बसविण्यात यावा ही मागणी होत होती. आमदार सुहास कांदे यांनी ही मागणी तडीस नेण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना त्यात यश आले. आमदार कांदे यांच्या प्रयत्नातून शहरातील रेल्वे स्टेशन गेट समोर संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारक उभारण्यात आले आहे.

शहरातील एकात्मता चौकासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात जगविख्यात पुज्य भन्ते डॉ. राहुल बोधी महास्थवीर यांच्या हस्ते आणि आमदार सुहास कांदे,
अंजुम कांदे यांच्या उपस्थितीत
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. पुतळा लोकार्पण हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता एकात्मता चौकात होणार आहे. लोकार्पण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक आमदार सुहास कांदे आणि अंजुम कांदे यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.