loader image
[ays_poll id=7]

साडे सहा लाखाची लाच स्वीकारताना ग्रामसेवकसह एक जण ताब्यात – ए सी बी ची कारवाई

Feb 7, 2024

नाशिक : साडे सहा लाखांची लाच घेताना पंचायत समितीच्या ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. मनोज पावरा , ग्रामसेवक, पंचायत समिती , अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार, (रा. दामोदर नगर, तळोदा) व खासगी इसम लालसिंग सिमजी वसावे, (रा. गमण, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार) अशी लाच घेणाऱ्या दोघांना ए सी बी ने ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची पत्नी ग्रामपंचायत सिंदुरी, तालुका अक्कलकुवा येथे सन २०१६ ते २०२० कालावधीत सरपंच होत्या. यानंतर ग्रामपंचायतीवर शासनाचे प्रशासक कार्यरत होते. या काळात ग्रामपंचायत सिंदुरी अंतर्गत मंजूर असलेले रस्ता काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसवणे अशी विविध आठ प्रकारची ग्रामपंचायतीला मंजूर असलेली कामे तक्रारदार व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पूर्ण केली आहेत.

ही कामे पूर्ण झाल्यानंतर कामांबाबतचे बिल ३२,३४,००० ग्रामपंचायत सिंदुरीच्या बँक खात्यात शासनाकडुन आले आहेत. नमूद कामांच्या बिलाचे चेक देण्याच्या मोबदल्यात दोघांनी तक्रारदाराकडे ३२,३४,००० या रकमेच्या वीस टक्के रक्कम म्हणजे ६,४७,००० रुपये लाचेची मागणी केली. आज ६,४७,००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक राकेश आ. चौधरी, पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक माधवी वाघ, पोहवा विलास पाटील, पोहवा देवराम गावित, पोना संदीप नावाडेकर, पोना नरेंद्र पाटील, पोना सुभाष पावरा, पोना संदीप खंदारे, पोना हेमंत महाले, चापोना जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली.

अजून बातम्या वाचा..

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
.