loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार लोकार्पण – मनमाड शहरात भव्य दिव्य भीमसृष्टी उभारणार – आमदार कांदे

Feb 7, 2024


आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच मी हे सर्व काही करू शकलो असेच आशीर्वाद कायम राहू द्या मी आपणास शब्द देतो की भविष्यात मनमाड शहरात भव्य दिव्य भीमसृष्टी उभारणार असे वचन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मनमाड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात दिले.
चाळीस वर्षानंतर मनमाड करांचे स्वप्न पूर्ण करू शकलो आणि ही जबाबदारी माझ्या नशिबात आली ही सर्व आपल्या आशीर्वादामुळेच शक्य झाले असे मनोगत आज मनमाड येथील लोकार्पण सोहळा प्रसंगी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे लोकार्पण आज मोठ्या उत्साहात हजारोंच्या संकेत नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या लोकार्पण सोहळा पूज्य भदंत डॉक्टर राहुल बोधीजी उपस्थित होते व त्यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी पूजेस आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजूम ताई कांदे बसल्या होत्या.
आज माता रमाई जयंती निमित्त मनमाड शहरातील विविध भागातून मिरवणूक काढून लोकार्पण सोहळा ठिकाणी या मिरवणुकीची समाप्ती झाली. यानंतर सर्वपक्षीय सर्व समाजातील पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक तसेच हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले भीम व आंबेडकर अनुयायी यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
मनमाडकर समाज बांधवांकडून आमदार सुहास अण्णा कांदे यांचा नागरी सत्कार करून त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले.
लोकार्पण सोहळा सुरू असताना आकाशातून हेलिकॉप्टर द्वारे पुष्पृष्टी करण्यात आली, दोन हेलिकॉप्टर ने आकाशात सात वेळा घिरट्या मारत स्मारकावर पुष्पवृष्टी केली.
लोकार्पण सोहळ्यानिमित्त कमालीचा उत्साह आनंद जल्लोष समाज बांधवांमध्ये पाहण्यास मिळाला.
मनमाड शहरातील आंबेडकर पुतळ्यास विशेष महत्त्व आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दीक्षा देणारे भदंत यांनीच मनमाड शहरातील पुतळ्याचे उद्घाटन केले होते या दृष्टिकोनातून या पुतळ्यास विशेष महत्त्व प्राप्त होते, चाळीस वर्षांपासून मनमाड शहरातील समाज बांधवांची पूर्णाकृती पुतळा असावा अशी मागणी शासनाकडे होती पण ती प्रलंबित होती, आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मनमाड शहरातील सर्व महापुरुषांची पुतळे व स्मारके नव्याने उभारणार असा शब्द निवडणुकीत दिला होता.
चाळीस वर्षांच्या पूर्णाकृती पुतळा ची मागणी आज पूर्ण होत असल्याने समाजबांधवांसाठी हा सुवर्णक्षण आहे आणि म्हणूनच आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण पत्रिका मिठाई तसेच एका सणाप्रमाणे साजरा करावयास लागणाऱ्या वस्तू एका लोकार्पण सोहळा निमित्त सप्रेम भेट लिहिलेल्या बॅग मधून मतदार संघातील समाज बांधवांच्या घराघरात जाऊन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमंत्रण देण्यात आले होते.
मनमाड शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकाचे भव्य दिव्य असे लोकार्पण काही दिवसापूर्वी झाले असून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे लोकार्पण अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात मनमाड करांना पाहायला मिळाले.
आज झालेला लोकार्पण सोहळा यासारखा आनंदाचा क्षण आणि सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा क्षण अण्णांनी त्याच तुलनेने साजरा केल्याची भावना व्यक्त करत समाज बांधवांनी अण्णांना धन्यवाद देत व आभार मानले.
याप्रसंगी मनमाड शहरातील सर्व समाज बांधव प्रतिष्ठित नागरिक, शिवसेना, भाजपा,आरपीआय, पीआरपी तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, नांदगाव विधानसभा मतदारसंघातील गावागावातील भीम अनुयायी आंबेडकर अनुयायी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.