Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मंत्री भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Feb 10, 2024

महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना अज्ञात व्यक्तीने पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. भुजबळांच्या नाशिक येथील कार्यालयात अज्ञात व्यक्तीने पत्र पाठवून त्यांना मारण्याची सुपारी घेतल्याचे म्हटले आहे. या धमकी पत्रानंतर भुजबळ यांच्या निवास्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

या धमकीनंतर मंत्री भुजबळांची सुरक्षा वाढविण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. भुजबळांना अशाच प्रकारे धमकीचे फोन व मॅसेज याधीही येऊन गेले आहेत. मात्र मंत्री छगन भुजबळ हे सध्या राज्यात चर्चेत आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांचा विरोध असल्याने, मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशात भुजबळांना पुन्हा धमकी आल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे.साहेब सावध राहा, 5 जण तुमचा शोध घेत आहेत…

साहेब तुम्हाला उडविण्याची सुपारी पाच लोकांनी घेतली आहे. ते गंगापूर दिंडोरी-चांदशी इशे हॉटेलमध्ये थांबले आहे. या लोकांनी तुम्हाला उडवण्याची 50 लाखांची सुपारी घेतली आहे. या गुंडांपासून सावध रहा, हे 5 जण तुमचा रात्रभर शोध घेत फिरत आहेत. सागर हॉटेलसमोर यांची मीटिंग झाली आहे. साहेब सावध राहा असे या पत्रात लिहले असल्याची माहिती मिळत आहे.

अजून बातम्या वाचा..

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]