loader image

नांदगाव सकल मराठा समाजाचे बेमुदत उपोषण सुरू

Feb 11, 2024


40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि मराठा समाज बांधवांची साडेतीनशेच्या वर बळी गेल्यानंतर अखेर मराठा आरक्षण संघर्ष सुद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या खडतर संघर्षानंतर अध्यादेशाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी सकल मराठा समाज नांदगाव तालुक्याच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण आज दिनांक 10 फेब्रुवारी 2024 पासून भास्कर झाल्टे व विशाल वडघुले यांनी सुरू केले आहे या बेमुदत आमरण उपोषणकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन मनोज दादा जरांगे पाटलांच्या सभेत हृदयविकाराच्या झटक्याने तांदूळवाडी चे कै.दादासाहेब पुंडलीक काळे यांचे दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून हे बेमुदत आमरण उपोषण सकल मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले आहे याप्रसंगी उपोषणकर्त्यांनी सकल मराठा समाज बांधवांना जाहीर आवाहन केले की या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी 15 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विधानसभेच्या व विधान परिषदेच्या मराठा आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी मराठा समाज बांधवांनी आपापल्या तालुक्यातील विद्यमान आमदारांना फोन कॉल करून किंवा मेसेज पाठवून या अधिवेशनात मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करण्यास भाग पाडावे तसेच या शेवटच्या अंतिम निकराच्या लढाईत मोठ्या संख्येने सामील होऊन हा लढा यशस्वी करावा ज्या समाज बांधवांना या बेमुदत आमरण उपोषणात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आयोजकांशी संपर्क करावा याप्रसंगी किरण जाधव,महेंद्र जाधव, विष्णू चव्हाण,गणेश काकळीज,ज्ञानेश्वर कवडे,सजन तात्या कवडे,विजय पाटील,निवृत्ती खालकर,गणेश सरोदे आणि भिमराज लोखंडे उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
.