नांदगाव : मारुती जगधने पिलखोड हुन नांदगाव कडे येणार्या कंटेनर ची दुचाकी ला जबर धडक दिल्याने
दुचाकीवरील दोन युवक ठार झाले असुन यातील एक युवक गंभीर जखमी झाला आहे हे तीघे जन कासारी ता.नांदगाव चे रहिवासी आहेत या दोघांवर दि १२ रोजी दुपारी शोकाकुल वातावरणात कासारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .
पिलखॊड वेहळगांव च्या दिशेने साकोरा नांदगाव कडे येणार्या कंटेनर ने साकोरा येथे दुचाकीला जबर धडक मारल्याने अतुल ज्ञानेश्वर पवार वय( ३० ,)नितीन राठोड (२८ ) रा. कासारी हे दोघे ठार झाले . तर
योगेश सुदाम राठोड( ३० ) रा.कासारी गंभीर. हा गंभीर जखमी झाला जखमीस नाशिक येथे उपचार चालू आहे . साकोरा येथे
कंटेनर नं एच आर ३८/ए सी ६०५९. आणि दुचाकी
टिव्हीएस नं एम एच ४१/बीजे ९९७८. या दोन वाहनात हा गंभीर अपघात झाला या घटनेची नांदगांव पोलीस स्टेशन मध्ये
गु. र .न.४९/२४. कलम ३०४ ए ,२९७,३३७,३३८,मोटार वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल आहे घटनेची
फिर्यदी विठ्ठल शामराव पवार, रा कासारी यांनी दाखल केल्यावर घटनेचा पुढील तपास नांदगांव पो नि प्रितम चौधरी,सा पो नि बडे,पो उ नि वाघमारे हे करीत आहे
