मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर होते तर कार्यक्रमाला संस्थेचे जनरल सेक्रेटरी वैभव कुलकर्णी, प्राथमिकचे मुख्याध्यापक दिपक व्यवहारे, संस्थेचे विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दहावीच्या परीक्षेला सामोरे जातांना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी. यशस्वी होण्यासाठी काय करावे? परीक्षेची भिती कशी दूर करावी? याबाबतचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मुकेश मिसर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
या निरोप समारंभात इयत्ता 10 वीच्या आदित्य सोनवणे, भक्ती चौधरी, श्रावणी चव्हाण, सई सोमासे, हेमांगी मुलचंदानी, आकांक्षा कातकडे, सिध्दी सानप या विद्यार्थ्यांनी नर्सरीपासून दहावी पर्यंतच्या आपल्या १३ वर्षाच्या प्रवासाचे अनुभव आपल्या मनोगतात व्यक्त केले. विद्यार्थ्यांनिनी ग्रुप डान्स सादर केला.
या निरोप समारंभाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन कु. नुतन पगारे व कु. सान्वी मिश्रा या विदयार्थिंनींनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.