loader image

आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. भारती पवार

Feb 16, 2024


केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय, दिव्यांग सशक्तिकरण विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेच्यावतीने आज कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात नाशिक जिल्ह्यातील एक हजार ३९७ दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम अवयव वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार बोलत होत्या. या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाचे मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार हे दूरदृष्टीप्रणालीद्वारे उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, संपूर्ण देशात ६९ ठिकाणी “सामाजिक अधिकारीता शिबिराचे” आयोजन करण्यात आले असून या शिबिरांचे उद्घाटन केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या शिबिरासाठी एलिम्कोच्या वतीने २६ ऑक्टोबर २०२३ ते ९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिरे घेण्यात आली होती. या शिबिरांमध्ये दिव्यांग बांधवांना नोंदणी करता यावी यासाठी प्रशासनामार्फत तंत्रज्ञानाचा वापर करून एक ॲप्लीकेशन विकसीत करण्यात आले आहे, ही कौतुकाची बाब आहे. या ॲप्लीकेशन मध्ये नोंदणी केल्यानुसार दिव्यांग बांधवांना आवश्यकतेनुसार एलिम्को कंपनीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून साहित्य तयार केले आहे. दृष्टिबाधित दिव्यांग बांधवांसाठी स्मार्ट मोबाईल व स्मार्ट केन (काठी) तयार केली आहे. या काठीचा वापर करतांना 3 मीटर अंतरावर असलेल्या अडथळ्यांची सूचना संबंधित दिव्यांग व्यक्तीला मिळणार आहे, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या दिव्यांग सशक्तिकरण विभागाच्या वतीने वाटप होणारे साहित्य दिव्यांगांना दैनंदिन जीवनात स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. एलिम्को कंपनी मार्फत देण्यात येणाऱ्या साहित्याचा वापर कसा करावा याविषयी संपूर्ण माहिती दिव्यांग बांधवांनी जाणून घ्यावी, ज्यामुळे सहाय्यक साहित्याचा वापर करणे सहज शक्य होईल.म्हणूनच जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग बांधवांना त्यांनी नोंदणी केल्याप्रमाणे आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून कोणीही दिव्यांग व्यक्ती यापासून वंचित राहणार नाही, या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचनाही यावेळी केंदीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या.
यावेळी आमदार देवयानी ताई फरांदे,जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, नाना शिलेदार, सुनिल पवार, विनायक करकरे, सिद्धेश बोरसे, योगेश तिडके, आदेश सानप, विजय कानडे,किरण बोरसे,मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जि. प.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, जि. प. जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) चे व्यवस्थापक अजय चौधरी, DHO डॉ मोरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
.