loader image

मनमाड महाविद्यालयात बॅरिस्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न

Feb 17, 2024




महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ अंतर्गत बॅरिस्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली.
व्याख्यानमालेचे उद्घाटन महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या हस्ते करण्यात आले. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ.किशोर पवार यांनी ‘चमत्कारा मागील विज्ञान’ या विषयावर व्याख्यान देऊन व काही प्रयोग सादर करून गुंफले. तरुण वर्गाने अंधश्रद्धेला बळी न पडता समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सक्रिय राहावे असे त्यांनी आवाहन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष निकम होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सांगितले की, सुशिक्षित समाज सुद्धा अंधश्रद्धेला बळी पडतो. या विषयीचे अनेक उदाहरणे सांगून, विद्यार्थ्यांना आवाहन केले की समाजाला प्रगत करण्यासाठी तरुण वर्गाने अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी जोमाने कार्य करावे. कला, वाणिज्य महाविद्यालय, येवला येथील प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले. त्यांनी विद्यार्थ्यांना बाह्य व्यक्तिमत्व व अंतर्गत व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा करावा याविषयी अतिशय ओघवत्या शैलीमध्ये अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. जे.वाय. इंगळे  होते. उत्कृष्ट जीवन जगण्यासाठी आपल्याला स्वतःलाच व्यक्तिमत्व विकास करून घ्यावयचा असतो असे त्यांनी प्रतिपादन केले.
नाशिक येथील ॲडव्होकेट श्रीमती मृणाल बुरकुले यांनी महिलांवरील अत्याचार व कायदा या विषयावर तिसरे पुष्प गुंफले. त्यांनी अतिशय अनुभव पूर्ण उदाहरणे देऊन महिलांसाठी असणारे कायदे, कायद्याचा कसा व केव्हा वापर करावा याविषयी अतिशय मोलाची माहिती विद्यार्थी व विद्यार्थिनींना दिली. त्याचबरोबर रुढी परंपरा व अंधश्रद्धा यामुळे स्त्रियांवर अत्याचार होतात. त्या साठी स्त्रियांनी  सक्षमपणाने काम करावे व समाजाची मानसिकता कशी बदलता येईल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. अध्यक्षस्थानी हिंदी विभाग प्रमुख डॉ. जे. वाय. इंगळे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी स्त्रियांवरती कशामुळे अत्याचार होतात त्याचे स्वरूप व प्रकार याविषयी माहिती सांगितली. त्याचबरोबर यासाठी कुठली उपाययोजना करता येईल याविषयी विवेचन केले.
सर्व वक्त्यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन करून प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयातील बहि:शाल मंडळाच्या कार्यवाहक प्राध्यापिका सौ.कविता काखंडकी यांनी केले. या व्याख्यानमालेच्या समन्वयकपदाची धुरा डॉ. गणेश जावळे यांनी सांभाळली. बहि:शाल मंडळाचे सदस्य प्रा. संदीप ढमाले यांनी व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. डॉ. परदेशी, प्राध्यापिका विजया सोनवणे,प्रा. मुसळे, डॉ. राठोड, प्रा. सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले. या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन कु. तेजल पानसरे, कु. तेहजिब शेख, प्रा. विजया सोनवणे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय चि. यश देठे, प्रा. संदीप ढमाले, कु. स्नेहा परदेशी यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. गणेश जावळे, चि. उमर राठोड व प्रा. विजया सोनवणे यांनी केले. विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त  प्रतिसाद या व्याख्यानमालेस लाभला.


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.