महात्मा गांधी विद्यामंदीर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मनमाड वाणिज्य विभागाचे TY .B.com विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची अभ्यास भेट दिनांक 14 फेब्रुवारी 2024 वार बुधवार रोजी भाग्यलक्ष्मी पतसंस्था मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य मा. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली.
भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक पी.बी परदेशी साहेब यांनी विद्यार्थ्यांना पतसंस्थेचे ध्येय ,धोरण ,उद्देश व सेवा, सुविधा यांचे सविस्तर मार्गदर्शन केले .तसेच कार्यकारी संचालक प्रदीप बोगावत यांनी महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना अभ्यास भेटीच्या वेळेस सविस्तर माहिती दिली. वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा .डॉ .एस. डी थोरे सर यांचा महत्त्वाचा सहभाग यामध्ये होता. तसेच प्रा.डॉ.आरती छाजेड मॅडम प्रा. सुनील मुसळे सर, प्रा.डॉ. विठ्ठल नजरधने सर, प्रा.समाधान सूर्यवंशी सर यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रा. स्व. संघ मनमाड जनकल्याण प्रकल्प समिती बैठक संपन्न
मनमाड - रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचलित जनकल्याण जनकल्याण रक्तकेंद्र, नाशिक चे कार्यवाह शैलेश...










