loader image

भर बाजारपेठेत झालेल्या चोरी बाबत व्यापारी महासंघातर्फे पोलीस स्टेशनला निवेदन

Feb 21, 2024




मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एकात्मता चौक येथील दुकानांमध्ये 21 फेब्रुवारीच्या रात्री एकाच दिवशी तब्बल तीन ठिकाणी धाडसी चोरी करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे रेल्वे स्टेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व नगरपरिषद यांच्या हाकेच्या अंतरावर असताना देखील या ठिकाणी धाडसी चोरी झाली . त्यामुळे व्यापारी घाबरलेले आहेत. दुष्काळाच्या झळामुळे आधीच मंदीत सापडलेला व्यापाऱी या धाडसी चोरीमुळे अधिकच धस्तावले आहेत. व्यापारी महासंघाच्या नेतृत्वाखाली सर्व व्यापाऱ्यांनी मनमाड शहर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन या चोरीचा लवकरात लवकर तपास करून व्यापाऱ्यांना न्याय द्यावा ही विनंती करण्यात आली. तसेच भर बाजारपेठेमध्ये रात्रीची गस्त वाढवून कायमचा बंदोबस्त देण्यात यावा अशी विनंती *व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारीक यांनी केले.* यावेळेस मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते गुरुजीतसिंग कांत, सुरेशशेठ लोढा,दादा बंब,मनोज जंगम ,अनील गुंदेचा,कुलदीपसिंग चोटमुरादी , महाराष्ट्र केटचे महासचिव कल्पेश बेदमुथा,रईस फारुकी,  चेतन संकलेचा,पारस हिरण, दीपक शर्मा ,बाबा पठाण,कैलासशेठ लोढा ,किरण पठाडे,कुमार मेहानी,शामकांत शिरोडे,दिपु चावला,अमरचंद मुथा, मनोज आचेलिया,आदी


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
.