loader image

पालीकेला ५ कोटी ५० लाख ५ हजार रुपये उत्पन्नात भर

Feb 22, 2024



नांदगांव : मारुती जगधने
येथील जुन्या महात्मा फुले भाजी मंडईच्या जागी पालिकेने शॉपिंग सेंटर बांधले आहे. शॉपिंग सेंटरचे काम पूर्ण झाल्यावर मागील वर्षी पालिकेने व्यापारी गाळ्यांची ऑनलाइन जाहीर भाडेकरार लिलाव प्रक्रिया राबविली. ऑनलाइन लिलाव प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्याने पालिकेने आपल्या अधिकारांचा वापर करत ही लिलाव प्रक्रिया रद्द केली. पालिकेने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या. अखेर न्यायालयाचा निर्णय पालिकेच्या बाजूने आल्यावर मंगळवारी येथील जैन धर्मशाळेत मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर भाडेकरार लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून नांदगाव मंडल अधिकारी व पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी उपस्थित होते.
मागील वर्षी झालेल्या ऑनलाइन लिलावात एकाही गाळ्याला दहा लाखांच्या वर बोली लागली नव्हती. मंगळवारी झालेल्या जाहीर लिलावात व्यापारी गळ्यांना दहा लाखांच्या पुढच्या दराने बोल्या लागल्याने पालिकेला व्यापारी गाळ्यांतून चांगले उत्पन्न मिळणार आहे. पंधरा दिवसात संबंधित गाळेधारकांनी आपले करारनामे पूर्ण करण्याच्या सूचना पालिकेच्या वतीने देण्यात आल्या. प्रशासकीय अधिकारी मुक्ता कांदे, कर निरीक्षक राहुल कुटे, लेखापाल संतोष ढोले, लेखा परीक्षक सतीशकुमार खैरे, प्रकल्प अधिकारी आनंद महिरे आणि पालिकेच्या कर्मचार्यांनी या कामी विशेष परीश्रम घेतले .
शहरातील पालिकेच्या मालकीच्या महात्मा फुले शॉपिंग सेंटरमधील (सीटी सर्व्हे क्रमांक २५२४) मधील व्यापारी गाळ्यांची जाहीर भाडेकरार लिलाव प्रक्रिया पोलिस बंदोबस्तात इन कॅमेरा पार पडली. एकूण ७३ पैकी ४६ गाळ्यांचे लिलाव झाले. लिलाव प्रक्रियेत बोली लागलेल्या ४६ गळ्यांच्या मोबदल्यात पालिकेला ५ कोटी ५० लाख ५० हजार रुपयांची ना परतावा अनामत रक्कम मिळणार आहे. आसाराम दुबे यांनी सर्वाधिक ५१ लाख ४० हजार रुपयांची बोली लाऊन गाळा घेतला .


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.