loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरात  रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Feb 25, 2024




नांदगाव – आमदार सुहास आण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या संकल्पनेतून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील तरुण-तरुणींना रोजगार मिळावा या हेतूने नांदगाव शहरातील शिवनेरी या शासकीय विश्रामगृह येथे आज भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
     महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज सन्स, हिताची जळगाव, रिंग प्लस एक्वा, लुपिन फार्मासुटिकल, व्हीआयपी टपारिया टूल्स गॅब्रियल ग्लेनमार्क एमडी इंडस्ट्रीज आदींसह अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
    मतदार संघातील बेरोजगार तरुणांनी मोठ्या संख्येने या संधीचा फायदा घेण्यासाठी गर्दी केली.
   आज झालेल्या रोजगार मेळाव्यात मतदारसंघातील 823 तरुण-तरुणींनी नोकरी करीता मुलाखत दिली. यामध्ये 417 जणांना तात्काळ नोकरीचे ऑफर लेटर देण्यात आले तसेच काहींना पुढील इंटरव्यू साठी नाशिक येथे बोलावण्यात आलेले आहे, या मध्ये दहावी बारावी पास नापास आयटीआय डिप्लोमा डिग्री तसेच फार्मासिटिकल व सिविल इंजिनियर यांचा समावेश होता.
    मतदारसंघातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून रोजगार मेळाव्याच्या आयोजनाची माहिती सोशल मीडिया व्हाट्सअप बॅनर तसेच पेपर द्वारे आधीच देण्यात आली होती. यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता आला.
    या वेळी बोलताना सौ.अंजुम ताई कांदे यांनी हा मतदारसंघातील सातवा मेळावा आहे आणि तालुक्याच्या विकासाबरोबर च आण्णा तरुणांच्या भविष्याच्या विकासाबाबत नेहमी विचार करून कार्य करतात असे सांगितले.
    या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रवी देवरे सरचिटणीस महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेना यांनी मेहनत घेतली.
     या मेळाव्या प्रसंगी नांदगाव शहराचे नगराध्यक्ष राजेशजी कवडे माजी सभापती विलास भाऊ आहेर किरण अण्णा कांदे ज्ञानेश्वर कांदे, बाजार समितीचे संचालक दीपक मोरे भैय्यासाहेब पगार संजय आहेर नंदू पाटील गुलाब भाबड सागर हिरे प्रकाश शिंदे सुनील जाधव राजाभाऊ देशमुख  प्रहार संघटनेचे संदीप सूर्यवंशी भाऊराव भाऊ बागुल शशिकांत सोनवणे रमेश काकळीज बापू जाधव उमेश मोरे निशांत बोडके आदींसह शिवसेना महिला आघाडीच्या विद्याताई जगताप संगीताताई बागुल पूजाताई छाजेड रोहिणी ताई मोरे तपासून शेख विद्या कसबे संगीता सांगळे भारती बागोरे सोनियासोर निशा चव्हाण जयश्री डोळे
आदींसह शिवसेना युवा सेना महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
.