नांदगाव : मारुती जगधने तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरीक जोरदार पावसाची अपेक्षा करीत आहे या मुळे पाणी टंचाईवर काही प्रमाणात दिलासा मिळेल माञ झालेल्या बेमोसमी पावसाने पिकांचे आतोनात नुकसान झाले .
तालुक्यात दि २७ रोजी दुपारच्या सुमारास ढगांच्या गड-गडाटा सह पावसाचे आगमन झाले यात शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली
या वादळवार्याच्या व काही प्रमाणात गारांचा पाऊस झाल्याची वार्ता आहे या बेमोसमी पावसाने डोंगळे,आंबामोहर ,शेवगा ,फळ पिकांचे व द्राक्षे पिकांचे नुकासान झाले तसेच साठवून ठेवलेला जनावरांच्या वैरणीचा
चारा, कडबा कुट्टी पावसात भिजला त्यामुळे जनावरांच्या वैरणीची चिंता पशुप्रेमींना निर्माण झाली.गत दोन दिवसा पासून लोक असाहाय्य उकाड्याने हैराण झाले होते झालेल्या पावसाने गारवा निर्माण झाला. तालुक्यात
मनमाड शहर आगस्ती डोंगर,हिसवळ, मोहेगाव,बेजगाव ,कर्हि, एकुळी, हिसवळ खु!! बु!!,,नांदगाव शहर व तालुक्याच्या पश्चिंम, दक्षिण भागाला पावसाने झोडपले यात गहु, हरभरा,या पिकांचे नुकसान झाले तर वादळाने अंबामोहर कैरी गळून पडली.
तालुक्यात सर्वच भागाना भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून प्रशासन पाणीटंचाईवर पुरेशी उपाययोजना करत नसल्याची नाराजी नागरीक व्यक्त करतात.शहरा लगतच्या गिरणानगर,मल्हारवाडी, श्रीरामनगर ,फुलेनगर ,हिंगणवाडी, गंगाधरी या गावांना कृञींम पाणी टंचाई निर्माण झाली आहे ३० दिवस झाले पण नळाला पाणी आले नाही दोन महिण्यापासून नांदगाव शहर व लागून असलेल्या सात ग्रांमपंचायतीना पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला पाण्याच्या टँकरसाठी नागरीकाना पैसे मोजावे लागत आहे .
होत असलेल्या बेमोसमी पावसाचे छतावरुन गळनारे पाणी साठविण्याची वेळ नागरिकावर आली आहे .बे- मोसमात देखील नागरीक जोरदार पावसाची अपेक्षा करीत आहे .नळाला पुरेसे पाणी येत नसल्याने पावासचे पाणी साठवण्याची वेळ शहरवासीयावर आली आहे.

