loader image

मनमाड महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

Feb 28, 2024



मनमाड. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रसिद्ध कवी प्रा. राजू लहिरे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. 27 फेब्रुवारी हा दिवस विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने   साजरा केला जातो,त्यांनी पुढे बोलताना ज्ञानाचा भांडार म्हणजे मराठी भाषा होय या मराठी भाषेच्या विकासामध्ये कुसुमाग्रज यांचे मोलाचे योगदान आहे असे मत त्यांनी मांडले. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मराठी  भाषेचा आदर करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ.जेवाय इंगळे होते त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मराठी भाषा गौरव दिनाचा उद्देश विद्यार्थ्यांसमोर मांडला विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा आदर केला पाहिजे तिचा गौरव केला पाहिजे व मराठी भाषेचा प्रचार प्रसार व तिचे संवर्धन केले पाहिजे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. पुढे बोलताना त्यांनी कवी कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेतील योगदानाचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. गजानन शेंडगे यांच्या “उपेक्षित मनाच्या अपेक्षित कविता” हा कविता संग्रह प्रकाशित झाला..त्याच प्रमाणे “व्यावसाय व्यवस्थापन” या विषयावरील संपादित पुस्तक प्रकाशित झाले या कवितासंग्रहांमध्ये प्रा. डॉ. गजानन शेंडगे यांनी त्यांना आलेले जीवनातील अनुभव कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विषयाचे प्रा. डॉ. युवराज भामरे यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून वेगवेगळ्या उदाहरण दाखल्यांच्या आधारे मराठी भाषेचे महत्व व तिचा वापर विद्यार्थ्यांसमोर मांडला याप्रसंगी वृषभ अहिरे,प्रसाद पगार, पूनम राजनोर या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित मराठी कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका अलका नागरे तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ.  जावळे सर  यांनी मानाले याप्रसंगी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर.डी. भोसले, डॉ. गजानन शेंडगे आय क्यू एसी कोऑर्डिनेटर डॉ  मिलिंद आहीरे, डॉ. विष्णू राठोड, प्रा. संदीप ढमाले प्रा. सुनिल मुसळे, प्राध्यापिका डॉ. आरती छाजेड, व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.