loader image

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा

Feb 29, 2024



“ज्ञानेश्वराने लिहिली ज्ञानेश्वरी” “तुकोबांनी रचली गाथा” “समृद्ध संपन्न झाली””माझी मराठी भाषा”.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता पहिली व इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. इयत्ता पहिलीचा विहान लिंगायत. ज्ञानराज थोरे. शर्वरी जगताप. राजुल बोथरा. या विद्यार्थ्यांनी “महाराष्ट्राची शान मराठी. “शिवरायांची बोली मराठी. “रयतेचा विश्वास मराठी.  “लाखोंचा स्वाभिमान मराठी. मुखामुखातील अमृतवाणी मराठी हीच आपली निशाणी ज्या भाषेत तुकोबांनी लिहिले महान अभंग अशी आपली मराठी भाषा अथांग गर्व आहे मला मी बोलतो मराठी ऐकतो मराठी शब्द कुसुमाग्रजांचे भावून गेले. मराठी मातीचे प्रेम दाखवून गेले. लावला त्यांनी साहित्यला हातभार ठरले ते मराठी भाषेचे शिल्पकार जन्मदिनी त्यांना करूया स्मरण 27 फेब्रुवारी प्रसिद्ध कवी लेखक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा ही भारतामध्ये सर्वात जास्त बोलणाऱ्या भाषेंपैकी तिसरी भाषा आहे मराठी भाषेला अधिक संपन्न बनविण्यासाठी संतांनी खूप परिश्रम घेतले सावता माळी.संत तुकाराम. संत ज्ञानेश्वर. यासारख्या संतांनी मराठी भाषेला जिवंत ठेवले तर शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा शब्दकोश तयार करून घेतला होता म्हणूनच “शान माझी मराठी.” मान माझा मराठी. “अभिमान माझा मराठी. “स्वाभिमान माझा मराठी. असे उद्गार इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात सांगितले. इयत्ता सहावीचा समर परदेशी. याने  आपल्या भाषणात “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी”. आपले विचार प्रकट केले. कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर.उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी सौ.राजश्री बनकर विलास कैचे. त्यांचे अनमोल असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रावणी खैरनार. आराध्या सांगळे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.