loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सौंदाणे यांनी केली पाहणी

Feb 29, 2024


नांदगाव आणि मनमाड शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, सदर परिस्थितीची माहिती मिळताच तहसीलदारांशी संपर्क साधून यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केल्या.
शहर परिसरासह ग्रामीण भागात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान केले. यामध्ये रब्बी पिकातील मका डाळिंब, शेवगा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची माहिती घेऊन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यानंतर आज आमोदे या गावी तहसीलदार सुनील सौंदाणे, कृषी अधिकारी गाडे, आमदार सुहास आण्णा कांदे यांचे प्रतिनिधी युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे, प्रकाश शिंदे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
आमोदे येथील शेतकरी विठ्ठल पुंडलिक पगार,संजय पगार बाबाजी पगार, गणेश पगार, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मका, डाळिंब शेवगा,पिकांची प्रतिनिधिक स्वरूपात पाहणी करून सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या आहेत.
आमोदे येथील सरपंच सौ वैशाली पगार, सदस्य विठ्ठल पगार, उपसरपंच भूषण पगार,कृष्णा पगार, रामकृष्ण पगार, समाधान पगार,वाल्मीक पगार, तलाठी तुषार येवले,कृषी सहाय्यक राहुल जैन आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे आमदार सुहास आण्णा कांदे हे मुंबई ला असून मनमाड नांदगाव शहरासह मतदारसंघात जोरदार पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या त्यांनी सूचना तहसीलदारांना दिल्या , तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सहसंबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची माहिती देऊन मदत देण्याची मागणी केली आहे.


अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
.