दिनांक 27 फेब्रुवारी2024 रोजी प्रसिद्ध कवी वि.वा.शिरवाडकर यांचे जन्म दिनानिमित्त मनमाड न्यायालयात मराठी राज्य भाषा दिन याविषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्ष मनमाड न्यायालयाचे न्यायाधीश श्री महेश खराडे साहेब होते.मराठी राज्यभाषा दिन या विषयी प्रमुख वक्ते वकील संघाचे माजी अध्यक्ष यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे साठी सर्व वकिलांनी आपल्या स्तरावर प्रबोधन करावे,जास्तीत जास्त प्रमाणात न्यायालयात देखील मराठी भाषेचा वापर करावा.महाराष्ट्र राज्यामध्ये 1997 पासून मराठी राज्य भाषा दिन साजरा केला जातो असे मनोगत व्यक्त केले.न्यायाधीश श्री खराडे साहेब व न्यायाधीश श्रीमती क्रांती मोरे मॅडम यांनी देखील सर्व नागरिकांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा,व मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले.वकील संघाचे अध्यक्ष ऍड.किशोर सोनवणे यांनी कवी कुसुमाग्रज वि.वा.शिरवाडकर यांची संपूर्ण माहिती दिली.ऍड.विष्णू कासार यांनी देखील मनोगत व्यक्त केले.सदरच्या कार्यक्रमास वकील संघाचे ऍड.एस. पी.पाटील,ऍड.निकम , ऍड,हेमंत सोनवणे,ऍड बापट,ऍड पांडे,ऍड मुनवर पठाण,ऍड शिकलगार,ऍड नासिर पठाण,ऍड योगेश मिसर,ऍड पूजा मल्हारी,ऍड यास्मिन शहा,ऍड कविता आव्हाड,ऍड पालवे,ऍड दुबे,व पक्षकार हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.सुधाकर मोरे यांनी केले.