loader image

नांदगाव येथे मुलीचा विनयभंग – दोघांना अटक

Mar 5, 2024





नांदगाव : मारुती जगधने
ओळखीचा गैर फायदा घेत मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या ही घटना नांदगाव शहरात घडली .
नांदगाव शहरातील एका अल्पवयीन मुलीच्या ओळखीचा फायदा घेऊन संशयीत आरोपी  हर्षदखान आश्रपखान इनामदार वय वर्षे 22 या नराधमाने ओळखीचा फायदा घेत आपला मित्र मुशरफाखान गुलशरखान पठाण वय वर्ष 22 या नराधमाने आम्हाला तुझ्या सोबत काही बोलायचे आहे असा बहाणा करुन  तरुणीला घरी बोलवून संशयीत  आरोपी  मुशरफाखान यांने घरात घालून बाहेरुन दरवाजा लावला दुसरा साथीदार  हर्षदखान आश्रपखान इनामदार यांनी  हात धरुन  बळजबरी ओढले व  त्यास विरोध केला तू मला बोलण्या करीता बोलविले तू हे काय करतोस असे करु नकोस मी विनंती केली आरोपी नंबर एक हर्षदखान आश्रपखान इनामदार यास दूर लोटून पळण्याचा प्रयत्न केला आरडाओरडा केला व घरातून बाहेर आली त्यावेळी आजुबाजुचे महीला जमा होवून पिडीतेला  गर्दीतून बाहेर काढून दिले व घरी निघून गेल्यावर फिर्यादीने  मोठ्या बहिणीला हा प्रकार सांगितला व पिडित मुलीच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली गुन्हा रजिस्टर नंबर 78 /2024 भा द वी कलम 354   बाल कायदा  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण अधिक्षक विक्रम जायभावे यांच्या आदेशानुसार पुढील तपास पो,उप विभागीय अधिकारी बाजीराव महाजन हे तपास करीत आहेत नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडे सह पोलीस शिपाई भास्कर पवार, प्रविण मोरे, अनिल जाधव,विक्रम देशमाने यांनी मालेगाव न्यायालयात हजर केले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.