loader image
[ays_poll id=7]

२५०० रुपयाची लाच स्विकारतांना सहा. पोलिस फौजदार एसीबीच्या जाळ्यात

Mar 7, 2024


 

 

नाशिक – शहरातील कॅफे सुरळीत चालू देण्याचे मोबदल्यात गेल्या ३ महिन्यांपासून दरमहा तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारात असणारा सहा. पोलीस फौजदार शंकर जनार्दन गोसावी हा २५०० रुपयाची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.

या कारवाईबाबत एसीबीने सांगितले की, तक्रारदार हे नाशिक शहर पोलीस आयुक्तालायचे हद्दीत एक कॅफे/ रेस्टॉरंट चालवितात. सदरील कॅफे/ रेस्टॉरंट हे कॉलेज परिसरात असल्याकारणाने तेथे विद्यार्थी – विद्यार्थीनीं यांची वर्दळ असते. त्यामुळे विद्यार्थी यांना प्रायव्हसी असावी म्हणून तक्रारदार यांनी रेस्टॉरंट मधील टेबलांना आडोसा केला होता. सदर बाबत माहिती यातील आरोपी लोकसेवक यास झाल्याने त्याने सुमारे सहा महिने पूर्वी तक्रारदार यांच्याकडे येऊन त्यांना तू कुंटणखाना चालवितोस तुझ्यावर कारवाई करेन असा दम देऊन तक्रारदार यांच्या कॅफेवर कारवाई न करण्याचे मोबदल्यात त्यांच्याकडून दरमहा २ हजार ते ३ हजार रुपये लाच म्हणून घेत असे.

तक्रारदार हे फक्त रेस्टॉरंट व्यवसाय करत असून कोणताही गैरव्यवसाय करत नाहीत. म्हणून त्यांना आरोपी लोकसेवक यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार केली. सदरील तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक हे विशेष शाखा, नाशिक शहर पोलीस येथे नेमणूकीस असताना तक्रारदार चालवीत असलेल्या रेस्टॉरंट व्यवसायशी त्यांचा काहीएक संबंध नसताना तक्रारदार यांचे रेस्टॉरंट सुरळीत चालू देण्याचे मोबदल्यात गेल्या ३ महिन्यांपासून दरमहा तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारात असल्याची कबुली देऊन आज रोजी २५००/- रुपये लाच मागणी करून मागणी केली लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु आहे.

लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
*युनिट – ला.प्र.वि. नाशिक
*तक्रारदार- पुरुष, ३० वर्ष, नाशिक

*आलोसे – शंकर जनार्दन गोसावी, सहा. पोलीस फौजदार, नेमणूक- विशेष शाखा, नाशिक शहर पोलीस दल.
रा. फ्लॅट नंबर 108, ठक्कर हार्मनी, ए विंग, शहनाई लॉन्स जवळ टाकळी रोड, तपोवन, नाशिक

*लाचेची मागणी- दिनांक ०६/०३/२०२४ रोजी२५००/-
*लाच स्विकारली -दिनांक ०६/०३/२०२४ रोजी २५००/-

लाचेचे कारण –
यातील तक्रारदार हे नाशिक शहर पोलीस आयुक्तालायचे हद्दीत एक कॅफे/ restaurant चालवितात. सदरील कॅफे/ restaurant हे कॉलेज परिसरात असल्याकारणाने तेथे विद्यार्थी – विद्यार्थीनीं यांची वर्दळ असते. त्यामुळे विद्यार्थि यांना privacy असावी म्हणून तक्रारदार यांनी रेस्टॉरंट मधील टेबलांना आडोसा केला होता. सदर बाबत माहिती यातील आरोपी लोकसेवक यास झाल्याने त्याने सुमारे सहा महिने पूर्वी तक्रारदार यांच्याकडे येऊन त्यांना तु कुंटणखाना चालवितोस तुझ्यावर कारवाई करेन असा दम देऊन तक्रारदार यांच्या कॅफे वर कारवाई न करण्याचे मोबदल्यात त्यांच्याकडून दरमहा २०००/- ते ३०००/- रुपये लाच म्हणून घेत असे.

तक्रारदार हे फक्त रेस्टॉरंट व्यवसाय करत असून कोणताही गैरव्यवसाय करत नाहीत. म्हणून त्यांना आरोपी लोकसेवक यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार केली. सदरील तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक हे विशेष शाखा, नाशिक शहर पोलीस येथे नेमणूकीस असताना तक्रारदार चालवीत असलेल्या restuarant व्यवसायशी त्यांचा काहीएक संबंध नसताना तक्रारदार यांचे restuarant सुरळीत चालू देण्याचे मोबदल्यात गेल्या ३ महिन्यांपासून दरमहा तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारात असल्याची कबुली देऊन आज रोजी २५००/- रुपये लाच मागणी करून मागणी केली लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु आहे.

*आलोसे यांचे सक्षम प्रधिकारी – पोलीस उपायुक्त, नाशिक शहर
*सापळा अधिकारी – संदीप बबन घुगे , पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सापळा पथक–
पोलीस नाईक/ गणेश निंबाळकर*
पोलीस शिपाई / नितीन नेटारे*
सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक* .


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
.