Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आचार्य देवनंदीजी महाराज त्यागी निवासाचे पोखरी ( नांदगाव ) येथे लोकार्पण

Mar 7, 2024

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील पोखरी येथे भव्य त्यागी निवासाचे लोकार्पण प्रज्ञाश्रमण आचार्य श्री नमोकार तीर्थ प्रणेता देवनंदीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. श्रावक श्रेष्ठी नूतनकुमार मोतीलाल कासलीवाल यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यागी निवासाचे बांधकाम करण्याचा संकल्प केला होता.या त्यागी निवासाचे भूमिपूजन आचार्य श्री देवनंदीजी महाराज यांच्या हस्तेच करण्यात आले होते. आता पाच वर्षानंतर याच मार्गावरून आचार्य श्री यांचा विहार होत असताना या त्यागी निवासाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुनिश्री सहजसागरजी महाराज ‘ मुनीश्री शांतीकीर्तीजी महाराज मांगीतुंगी जी येथील ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष सुमेरजी काले, अंजन गिरी चे अध्यक्ष पवन जी पाटणी ,गजपंथा चे विश्वस्त पारसजी लोहाडे ,नमोकर तीर्थ चे विश्वस्त विजयकुमार लोहाडे नांदगाव येथील अध्यक्ष सुशीलकुमार कासलीवाल,पोखरीचे सरपंच अँड किरण गायकवाड, व अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आचार्य श्री यांनी सांगितले की हे त्यागी निवासाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी नूतनजी यांनी आपल्या चंचला लक्ष्मीचा सदुपयोग केला आहे आणि त्यांनी नूतन कासलीवाल यांना जैन समाजरत्न या पदवी ने गौरविले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. अंजली सुमेर कासलीवाल यांनी केले . यावेळी बाजार समितीचे संचालक अमोल नांवदर ‘ सागर हिरेपाटील ‘ रामनिवास करवा ‘ रिखबकाका कासलीवाल ‘ दिपक कासलीवाल ‘ मुकूंद खैरणार ‘ सोमनाथ घोंगाणे ‘ समीर कासलीवाल ‘ आनंद कासलीवाल ‘ आनंद चोरडीया ‘ सचीन पारख ‘ बाजार समितीचे सभापती अर्जून ( बंडू) पाटील ‘ सुभाषशेट पवार ‘ संजय गायकवाड ‘ संतोष भोसले ‘ सचीव अमोल खैरणार ‘ भाऊसाहेब आगवण ‘ शरद आहेर ‘ बन्सी नगे आदीसह शहरातील समाज बांधव मोठया संख़्येने उपस्थित होते .

अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]