loader image
[ays_poll id=7]

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

Mar 9, 2024


“तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगन ही ठेंगणे भासावे तुझ्या विशाल पंखा खाली विश्व सारे वसावे” कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले,इंदिरा गांधी,झाशीची राणी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे ,प्राचार्य मुकेश मिसर,उपप्राचार्य वैभव कुलकर्णी कार्यक्रमास उपस्थित होते. इयत्ता सहावी व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.इयत्ता सहावीच्या अनुष्का सोनवणे, अक्षदा सोनवणे,दर्शिता गोयल,वृंदा जोशी यांनी आपल्या भाषणात स्त्री प्रत्येक कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग असते,स्त्री शिवाय कुटुंब पूर्ण होऊ शकत नाही. कुटुंबाशिवाय समाज पूर्ण होऊ शकत नाही .आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक स्त्री ही मुलगी,पत्नी, आई ,मावशी ,आजी अशा अनेक भूमिका जबाबदारीने पार पाडते. महिला दिनाची खरी सुरुवात स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नाने अमेरिकेत 1908  साली झाली.8 मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये कपड्याच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी काम जास्त मजुरी कमी या कारणाने लढा पुकारला .स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला संघर्ष हा जगातील पहिला संघर्ष होता .8 मार्च या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता मिळाली .”नभी झेपणारी तू पक्षिणी..सक्षम कर्तव्यदक्ष तु गृहिणी ..प्रसंगी कडाडणारी तू सौदामिनी ..।शत्रूस धूळ चारणारी तू रणरागिनी।।”आज महिला प्रत्येक क्षेत्रात काम करतात नेव्ही,पोलीस, डॉक्टर, इंजिनिअर ,शिक्षिका, राष्ट्रपती,पंतप्रधान,नर्स इत्यादी अनेक पदावर आत्मविश्वासाने कार्यरत आहेत .महिलांचा सन्मान राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे अशा शब्दात त्यांनी आपले विचार मांडले. इयत्ता पहिलीच्या मुलींनी विविध वेशभूषा पार पडत कार्यक्रमाची शोभा वाढवली. स्वरा अनिल आव्हाड राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा तर श्रेया किरण पाटील हिने सावित्रीबाई फुले  वेशभूषा स्वीकारली. स्वरा हेमंत अडावदकर हिने झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची वेशभूषा स्वीकारली. श्रावणी योगेश बनकर हिने इंदिरा गांधींची वेशभूषा स्वीकारली. अफिया रईस शेख हिने मदर टेरेसा यांची वेशभूषा स्वीकारली. मेहविश नदिम खान हिने किरण बेदी यांची वेशभूषा स्वीकारली .माही अमोल जगताप हिने लता मंगेशकर यांची वेशभूषा स्वीकारली. तिने “ए मेरे वतन के लोगो जरा आखों मे भरलो पाणी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी “हे गाणं म्हटले महिलांविषयी आदर .आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात जल्लोषात जगभरात साजरा केला जातो. स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले. साने गुरुजींवर संस्कार करणाऱ्या यशोदाबाई . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ देणाऱ्या रमाई. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत गोरगरिबांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या लक्ष्मीबाई अशा प्रकारे स्त्रियांचे महत्त्व अनन्य साधारण आहे .आई म्हणून. बहीण म्हणून .मैत्रीण म्हणून .बायको म्हणून .मुलगी म्हणून .तिच्या कर्तव्यात ती कधीही कमी पडत नाही. तिला हवी असते .फक्त तुमची साथ. अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा .मानाचा मुजरा .”ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला “.त्याला बहीण म्हणून कळली तो मुक्ताई चा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री बायको म्हणून कळली तो सीतेचा राम झाला .अशा शब्दात मुलांनी भाषणे केली “वार नाही तलवार आहे .ती समशेरची धार आहे. म्हणजे रत्री अबला नाही ती तर धगधगता अंगार आहे .”महिलांचा करा सन्मान .देश बनेल महान” जबाबदारी सह घेते भरारी. नाव तिचे आहे नारी. इयत्ता सहावीच्या नव्या बोदडे,युतिका संसारे,किमया गोटे,खुशी सोनवणे,अदिती पवार,वृंदा जोशी,अक्षदा सोनवणे,अनुष्का सोनवणे,दर्शीता गोयल,सृष्टी सोनवणे,सई शाकाद्विपी या मुलींनी सुंदर  डान्स सादर केला .या डान्सचे कोरोग्राफीचे काम भारती पवार यांनी केले. इयत्ता सहावी व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना अमिता झाडे,सौ ज्योती खैरे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सई  शाकाद्वीपी ,सृष्टी सोनवणे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.