नगरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये ४५ किलो वजनी गटात ६० किलो स्नॅच ७५ किलो क्लीन जर्क १३५ किलो वजन उचलून आकांक्षा किशोर व्यवहारे हिने युथ ज्युनियर व सीनियर तिन्ही गटामध्ये तीन सुवर्णपदके तसेच ४५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले आहे. आकांक्षा सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरण औरंगाबाद येथे प्रशिक्षण घेत असून छत्रे विद्यालयात ११ वी सायन्स ला शिकत आहे.
आकांक्षा ला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ सुनील बागरेचा, प्रा दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर,अध्यक्ष पी जे दिंडोरकर,संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर एन थोरात,उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,पर्यवेक्षिका सौ.पोतदार एस एस, महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने, अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
केंद्राचा अर्थसंकल्प यंदा ‘रविवारी’ सादर होणार!!
नुकतीच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षेतखाली कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्सनं...











