loader image
[ays_poll id=7]

अडीच महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या साकोरा वासियांना प्रतीक्षा उपाययोजनांची

Mar 18, 2024


नांदगाव : मारुती जगधने अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर साकोरा गावाला शास्वत पाणी पुरवठा होणार असल्याची बातमी नागरिकांच्या कानावर पडली ती खरी ठरो यासाठी नागरीक रोज कपालेश्वर महादेव मंदिराच्या पिंडीवर पाणी घालण्याचे काम श्रध्देने व मनोभावे करीत आहे कारण दि ५ एप्रिला साकोरा गावची पाणी योजना कार्यन्वीत होणार आहे. गत दोन अडीच महिण्यापासून गाव पाणी टंचाईच्या झळा सोसत आहे गावातील समाजसेवक यावर काही उपाय करीत नसतानाची खंत सर्व थरातुन व्यक्त होत आहे ?
नांदगाव तालुक्यात दुसर्या क्रमांकाची लोकसंख्या असलेले गाव साकोरा या गावाची लोकसंख्या सुमारे १८ हजार असलेले साकोरा गाव जिल्हा परिषदेचा गट आणी गण देखील आहे या गावाला आजतागायत तीन पाणी योजना राबविल्या पण त्या कालबाह्य झाल्या आता नव्याने शास्वत पाणी योजना राबविण्याचे काम हाती घेतले आहे या साठी शासनाने साकोरा गावासाठी ४ कोटी ९२ लाखाची योजना हाती घेतली ही योजना आत्ता पर्यंत पूर्ण व्हायला हवी होती पण ठेकेदाराच्या आले मना तेथे गावाचे व पुढार्यांचे, अधिकार्यांचे काही एक चालेना अशी गत झाली आहे ? या साठी गावात नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली या सभेला फक्त ५ ग्रा.प.सदस्ये उपस्थित होते. १८ सदस्य असलेली साकोरा ग्रांमपंचायत आहे येथे ८ महिला सदस्या आहेत पण पाण्यासारख्या गंभीर ज्वलंत प्रश्नासाठी बोलवलेल्या ग्राम सभेला एकच महिला उपस्थित होत्या हे गावाचे नशीब म्हणावे का? दोन महिने झाले गावाला पाण्याचा थेंब नाही सन १९७२,१९८२ हुन बिकट अवस्था गावाची झाली त्या काळात साकोरा गावाच्या तीरावरील शाकंबरी नदीच्या किणारी असलेल्या दोन विहिरींचे पाणी हौदात पडायचे आणी त्या दोन हौदातुन राञंदिवस लोक डोक्यावर हंड्याने कवाडीने किंवा सायकल वर पाणी वाहून नेत असत ही सवय तेव्हा नागरीकाना होती तेव्हाची लोकसंख्या जेमतेम ७ ते ८ हजार होती.आज त्या लोकसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे आणी आता पाणी नसल्याने तिन चार टँकरच्या मदतीने हौदात पाणी पडते ज्याच घर जवळ त्याला मुबलक पाणी मिळते ज्याचे घर लांब त्याची पाण्यासाठी बोंबाबोंब हौदातुन पाणी भरताना हंड्याला हंडा लागतो आणी पाणवट्यावर
रोज लाहान मोठी भांडण पाण्यासाठी होतात. सध्या गावाच्या चार बाजूला चार हौद बांधले आहे त्यात पाणी पडते पण ज्यांचे घर गावाच्या मध्यभागी आहे त्याला टँकर केव्हा येतो आणी पाणी टाकून जातो ते कळत नाही ही एक डोकेदुखी झाली आहे .सुमारे सोळा हजार लोकसंख्या असलेल्या गावात दोन माध्यमिक व एक प्राथमिक विद्यालय आहे.गाव तस पुढारलेल व सुशिक्षित आहे पण पाण्याने गावाची चव घालवली असा सुर नागरिकात उमटतो. ज्या ज्येष्ठांच्या घरात तरून व्यक्ती नाही किंवा आजारपण आहे अशा नागरीकाना विकत पाणी घ्यावे लागते सध्या साकोरा गावात १ हजार लिटर पाण्याला २५० ₹ मोजावे लागतात गावात १० ते १२ पाणी वाहतूक करणारी छोटी छोटी वाहने आहेत ते गावाची कशीबशी तहान भागवतात गावासाठी राबविण्यात येणारी पाणी योजना रखडल्याने साकोरा गांव पाणी टंचाईच्या झळा सोसत आहे .

सोळा हजार लोक संख्या असलेल्या साकोरा गावाला
सुमारे पाच कोटी ची योजना मंजुर आहे बरेचसे काम झाले पण ते पुर्णत्वास जात नाही घोड कुठे आडले हे पुढारी व ठेकेदार आणी अधिकारी जाणो ? आमदार सुहास कांदे यांच्या सहकार्याने गिरणा धरणातुन शास्वत पाणी योजना राबवली जात आहे.सध्या गावाला टँकरने पाणी वाटप होते ते ही पुरातन कालबाह्य पध्दतीने या गावाला सन
सन २०१४ मध्ये रोज पाणी येत होते. आता गावाला वाली नाही अशी खंत लोक व्यक्त करतात. पुढारी लक्ष देत नाही संबधित ठेकेदारने काम पूर्ण केले नाही .अशी मौखिक ओरड करतात.
सध्या ३ टँकर च्या मदतीने १ लाख २०हजार लिटर पाणी चार हौदात पडते ते पडताच अर्ध्या तासात हौद कोरडा होतो.एकाच वेळेला शेकडो भांडे हौदात पडतात.आता नव्याने दोन चौकात हौदाची मागणी आहे .
गावासाठी गिरणा धरणातुन राबविली जानारी पाणी योजना ४ कोटी ९२ लाखाची आहे तिचे अंतर १४ किमी एवढे आहे .या राबविले जाण्यार्या पाणी योजनेची मुदत सन २०३७ पर्यंत आहे .
एकंदरीत गावाची तृष्णा भागविनारी शास्वत योजना तत्काळा राबवून गावाला पाणी पुरवठा करण्याची मागणी सर्व थरातुन होत आहे.
प्रतिक्रिया : दोष देण्या एैवजी काम करुन घेणे बरे ठेकेदारने ५ एप्रिला पाणी देणार असल्याचे आश्वासन ग्रांमसभेत दिले आहे .विजेचा खोंळंबा आला होता आता वीज पोल टाकण्याचे काम चालू आहे .
२५ HP चे दोन विज पंप बसविले आहे या योजनेतून साकोरा गावाची लवकरच तहान भागविली जाणार विद्यमान आमदार कांदे यांच्या मदतीने ही योजना साकारते आहे .
रमेश उग्रसेन बोरसे माजी जि प सदस्य साकोरा गट


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.