loader image
[ays_poll id=7]

नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

Mar 23, 2024




मनमाड – मार्च महिन्यातच जिल्ह्यात तापमान ३३ ते ३५ अंशांवर पोचल्याने उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. यातच यंदा दुष्काळाचे तीव्र सावट असल्याने प्रामुख्याने मालेगाव, येवला व नांदगाव या तालुक्यांमध्ये उष्मघाताची लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उन्हाचा पार वाढत असल्याने उष्माघात होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सरसावला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ११२ आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित केले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे संकट गंभीर आहे. यातच, मार्च महिन्याच्या मध्यावर्तीपासूनच उष्णतेची लाट वाढत आहे. आताच जिल्ह्याचा पारा हा ३५ अंशांपर्यंत पोचला आहे. एप्रिल व मे महिन्यात उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. याकरिता फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे उष्माघात प्रतिबंधात्मक उपायांवर प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित केला आहे.

यात एक खाट आरक्षित केली आहे. उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्यासाठी उपाययोजना असावी, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात सज्जता ठेवण्यात आली आहे.

ही आहेत उष्माघाताची कारणे

उन्हामध्ये शारीरिक श्रमाचे, मजुरीचे कामे फार वेळ करणे, कारखान्याचे वॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येणे.

ही आहेत उष्माघाताची लक्षणे

शरीरास घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्क होणे, थकवा येणे, ताप येणे (१०२ पेक्षा जास्त), त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन, अस्वस्थ, बेशुद्ध अवस्था इत्यादी, उलटी होणे आदी.

हे आहेत उपचार

रुग्णास हवेशीर खोलीत ठेवणे, खोलीत पंखे वा कुलर ठेवावेत. शक्यतो वातानुकूलित खोलीत ठेवावे, रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, रोग्याला बर्फाच्या पाण्याने अंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या, आइसपॅक लावावेत, ओआरएस सोल्यूशन द्यावे.

असे आहेत प्रतिबंधात्मक उपाय

वाढत्या तापमानाच्या वेळेत कष्टाची कामे टाळणे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा सायंकाळी कमी तापमान असताना करावी, उष्णता शोषून घेणारे कपडे उदा. काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नयेत, सैल व उष्णता परावर्तित करणारे पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे, उन्हामध्ये काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी.

शक्यतो उन्हात फिरण्याचे टाळावे, आवश्यक कामे असल्यास उन्हात जाण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे, उन्हात जाण्याअगोदर जेवण करावे, रिकाम्या पोटी उन्हात जाऊ नये, कान व डोक्याचा उन्हापासून बचाव करणे आवश्यक आहे. डोक्याभोवती पांढरा रुमाल गुंडाळावा. गॉगल्स व हेल्मेट वापरावे, वृद्धांना व बालकांना उन्हात फिरू देऊ नये आदी.

”उन्हाळ्यामुळे उष्माघाताने रुग्णावर उपाययोजना करणेसाठी व मृत्यू टाळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा, तसेच नागरिकांना उपचारासाठी सुविधा व्हावी यासाठी आरोग्य विभागाने ११२ आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित केले आहेत. येथे सर्व उपचार, औषधसाठा यांची सुविधा आहे.”- डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद


अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.