loader image

लासलगाव  येथे खासगी क्लासमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

Apr 6, 2024

लासलगाव –  प्रतिनिधी

येथील खासगी क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना तुम्हाला शाळेचे सर्व पेपर दाखवतो असे अमिष दाखवुन जवळीक साधुन लज्जास्पद वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी खाजगी क्लासच्या दोघांविरुद्ध विनयभंग आणि पोस्को अंतर्गत लासलगाव पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार दि २६ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास लासलगाव येथील ग्रामपंचायत हॉल जवळील खाजगी क्लास मध्ये यातील दोन्ही विद्यार्थिनी अल्पवयीन आहे असे माहित असताना देखील संशयित यांनी तुम्हाला शाळेचे सर्व पेपर दाखवतो असे अमिष दाखऊन त्यांच्याशी जवळीक साधुन या दोन्ही मुलींना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले म्हणून नुमान महेबुब शेख रा. टाकळी विंचुर ता. निफाड व सुमित संजय भडांगे रा. गणेश नगर लासलगाव यांचे विरुद्ध भादवी का. कलम 354,354 (अ), (ड), 34, सह पोक्सो का. कलम 8,12 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुरासे करीत आहेत. लासलगाव पोलीस कार्यालयात वरील गुन्हा दाखल झाला असला तरी याबाबत इतर पालक अगर विद्यार्थिनी यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी लासलगाव पोलिसांशी संपर्क साधावा त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल अशी माहिती लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी दिली आहे.

अजून बातम्या वाचा..

ऐन दुष्काळात 50 वर्षात पहिल्यांदा पाटाला आले पाणी, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले जलपूजन, शेतकऱ्यांनी केला आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरी सत्कार

ऐन दुष्काळात 50 वर्षात पहिल्यांदा पाटाला आले पाणी, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले जलपूजन, शेतकऱ्यांनी केला आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरी सत्कार

नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित...

read more
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र आयोजित नमो चषक 2024 राज्यस्तरीय भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत नांदगाव तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र आयोजित नमो चषक 2024 राज्यस्तरीय भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत नांदगाव तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.

  मनमाड:- भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक आयोजित नमो चषक 2024 टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे भव्य...

read more
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा: डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा: डॉ भारती पवार

  विकसित भारत संकल्प यात्रा जनजागृती कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि...

read more
भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची 99 जयंती सुशासन दिन म्हणून साजरी

भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची 99 जयंती सुशासन दिन म्हणून साजरी

मनमाड - भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्ते चे प्रमुख प्रेरणा स्थान माजी...

read more
चौथ्या महिला धोरणास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील? – वडिलांच्या आधी लावावे लागणार आई चे नाव

चौथ्या महिला धोरणास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील? – वडिलांच्या आधी लावावे लागणार आई चे नाव

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या बारातमती दौऱ्यावर असून तेथे त्यांनी शासकीय धोरणांवरही...

read more
.