loader image

चांदवडी पेढ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पोर्ट्रेट रांगोळी साकारून भीम जयंती निमित्त कलाशिक्षक देव हिरे यांचे अनोखे अभिवादन!

Apr 13, 2024



      दि.१४ एप्रिल २०२४ रोजी भारतरत्न ,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात सर्वत्र साजरी होत आहे.
     पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चांदवड नगरीत चांदवडी रुपय्या चा प्रसिद्ध ऐतिहासिक वारसा आहे.डोंगर रांगांमध्ये वसलेले हे ऐतिहासिक चांदवड शहर दुग्धव्यवसाय व खव्या साठी ही प्रसिद्ध आहे आणि याच खव्यापासून चांदवडी पेढा तय्यार होतो हा पेढा सर्वदूर आपली गोडी टिकवून आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात आपण तोंड गोड करून पेढा भरवून करत असतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त याच चांदवडी पेढ्यावर डॉ.आंबेडकरांची प्रतिमा रांगोळीच्या सहाय्याने साकारून ही भीम जयंती अधिक गोड व्हावी म्हणून चांदवड,भाटगाव नूतन माध्यमिक विद्यालयाचे प्रसिद्ध कला शिक्षक श्री.देव हिरे यांनी तब्बल 3 तासात रांगोळीच्या वापर करून पेढ्यावर ही पोर्ट्रेट रांगोळी साकारून महामानवास एक आगळे वेगळे अभिवादन केले आहे.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.