Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ  – काँक्रीटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

Apr 13, 2024

मनमाड – दीड दोन वर्षांपूर्वी शहरातील मुख्य बाजारपेठेतील एकात्मता चौकात काँक्रीटीकरण रस्ते बनविण्यात आले होते.ह्या रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडल्याने हे खड्डे बुजविण्यास कच चा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने  संताप व्यक्त होत आहे. निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे पितळ उघड पडले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मनमाड नगर परिषदेच्या अंतर्गत सुमारे दोन वर्षापूर्वी मनमाड शहरातील मुख्य रस्ते सिमेंट क्रॉक्रीटीकरणाचे करण्यात आले होते मात्र सदर सिमेंट कॉक्रीटच्या रस्त्यावर खड्डे पडत चालल्याने काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे पितळ उघडे पडले असून सिमेंट कॉक्रीटच्या रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी चक्क कच टाकून त्यावर पाणी मारले जात आहे त्यामुळे वाहन धारक घसरून पडून जखमी होत असल्याचा प्रकार या रस्त्यांवर होत असून या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

सदर रस्ता हा सिमेंट चा असल्याने खड्डे क्रॉक्रीट मटेरियलने स्पॅच टाकणे गरजेचे असतांना मात्र त्यात कच टाकून पाणी मारून लेव्हल केले जात आहे सदर प्रकार हा हास्यास्पद असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असल्याने प्रशासन झोपेचे झोंग घेत असल्याचे दिसत असून मात्र नागरीकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वास्तविक
नगरपालिकेचे ठेकेदाराने घेतलेले काम त्याने पुर्ण करुन त्याची मेंन्टेनन्सची जबाबदारी असते तशा कंडीशन्स असतात मात्र सदर ठेकेदाराकडून ही जाबबदारी टाळली जात असून पालिका सदर खडड्यांवर कच टाकून धातुरमातूर काम केले जात असून किपतत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तरी संबंधीत ठेकेदारावर नगरपालिकेने कारवाई करून त्यास ब्लॅक लिस्ट करावे. सदर कॉक्रीट रस्त्यावरील खड्डे क्राक्रीटच्या सहाय्याने स्पॅच मारावे अशी मागणी करीत आहोत अन्यथा शिवसेनेकडून तिव्र आंदोलन छेडले जाईल याची सर्वस्वी जबाबदारी नगर पालिका प्रशासनावर असा इशारा शहर प्रमुख माधव शेलार यांनी दिला आहे.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]