कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन-प्राचार्य मुकेश मिसर हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेचे चेअरमन आणि शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर व संस्थेचे जनरल सेक्रेटरी वैभव कुलकर्णी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात मुकेश मिसर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील विविध घटनांचा उल्लेख करत त्यांच्या कर्तृत्वाचा व जिवनकार्याचा गौरव केला.
याप्रसंगी संस्थेचे जनरल सेक्रेटरी वैभव कुलकर्णी, उपाध्यक्ष धनंजय निंभोरकर आणि प्राथमिकचे मुख्याध्यापक दिपक व्यवहारे यांच्यासह राम महाले, राजेश सोनवणे, सचिन आव्हाड व मनोज जाधव आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले