मनमाड : योगेश म्हस्के भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ,राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधरक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात.
यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती , मनमाड शहरामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदात सर्वधर्मीय नागरिक हे बाबासाहेबांची जयंती साजरी करत असतात. यंदाच्या वर्षी देखील विविध कार्यक्रमाद्वारे जयंती साजरी करण्यात आली , डॉ बाबासाहेब आंबडेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आकर्षक अशी विद्युतरोषणाई करून आकर्षक सजावट करण्यात आली होती, 14 एप्रिलच्या पुर्व रात्रीला 12 वाजता शहरातील भीम अनुयायी आणि प्रेमींनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. डॉ बाबासाहेब आंबडेकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन आतिषबाजी करण्यात आली , शहरातील विविध सामाजिक संघटना आणि संस्थेच्या वतीने महामानव यांची जयंती साजरी करण्यात आली.
सायंकाळी शहरातील सर्वच परिसरातून जवळ-जवळ 30 ते 40 विविध सामाजिक विषयांचे देखावे असणारे चित्ररथ काढण्यात आले, यावेळी मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शहरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.