मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये दि.23 एप्रिल 2024 रोजी ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शन करून जागतिक पुस्तक दिवस साजरा करण्यात आला.
ग्रंथालयात विविध लेखकांची वाचनीय पुस्तकांची मांडणी करण्यात आली होती.शाळेचे मुख्याध्यापक,संस्थेचे सदस्य,पर्यवेक्षक, व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुस्तकांचे वाचन केले.उपशिक्षक जलालुद्दीन सौदागर व ग्रंथपाल मन्सूरी अब्दुल हमीद यांनी जागतिक पुस्तक दिनाची माहिती देऊन पुस्तक वाचनाचे महत्व स्पष्ट केले.

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड च्या गिरी प्रेमींनी दुर्ग पूजन व ध्वजारोहण करत साजरा केला मूर्ती प्रतिष्ठापना क्षण
प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अगस्ती ऋषींचा वास्तव्य असलेल्या किल्ले अंकाई...