श्री रामदूत रामप्रिय देवाधिदेव श्री महादेव यांचे अंश रूद्रअवतारी श्री हनुमान जी महाराजांचा जन्मोत्सव एफ.सी.आय रोड येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला, श्री हनुमान जन्मोत्सव
साजरा करण्यासाठी भरगच्छ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . सकाळी 5.30 वाजेपासून भक्तगण मोठ्या संख्येत उपस्थित होते,
सकाळी 6.00 वाजता श्रीहनुमान जन्मोत्सव ,महाअभिषेक , उपासना, रामरक्षा व हनुमान चालीसा पठन व आरती करण्यात येऊन सकाळी 7.00 वाजेपासून लाडु प्रसादाचे वाटप करण्यात आले,
दुपारी 12.00 ते 3.00 वाजेपर्यंत महाप्रसाद ( भंडारा) ठेवण्यात आले ,त्यात परिसरातील नागरिक व भक्तगण मोठ्या संख्येत उपस्थित होते.
दुपारी 4.00 वाजता श्रीदत्त मंदिर भजनी मंडळाचे भजन व
सायंकाळी 6.30 वाजता श्री दत्तोउपासक भजनी मंडळाचे भजन ठेवण्यात आले ,मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येऊन विशेषत: रामायणातील मुख्य प्रसंगाचे चित्रीत देखावे मंदिरात प्रदर्शित करण्यात आले, मंदिरातील सचित्र देखावा रोहन अग्रवाल यांचे संकल्पनेतून साकारण्यात आला
सर्व श्रीराम व हनुमान भक्त व सेवक व इतर समस्त भक्तगण यांचे उपस्थितीत जय श्रीराम जय श्रीहनुमान नावाचा जयघोष करुन श्रीहनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी अत्यंत उपयुक्त– डॉ. भारती पवार
पिंपळगाव बसवंत येथे ॲग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि...