loader image

बघा व्हिडिओ-चारा पाण्याच्या शोधात हरणांच्या कळपांची मानवी वस्तीकडे धाव

May 3, 2024


 

नांदगांव : मारूती जगधने तालुक्यात भीषण पाणी टचाई असल्याने शिवाय वनविभागाने ठिकठिकाणी पाण्याचे तळे आणी सिमेंट टाक्या उभारले असले तरी ते आता तोडके पडू लागल्याने हरीण,काळवीट आता मानवीवस्तीकडे चारा पाण्याच्या शोधात भटकंती करताना दिसत आहे .वनविभागाने आजुन वनतळे किंवा सिमेंट टाक्याची वाढीव (टँक) पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी बि.एम.जे फाउन्डेशन व पशुप्रेमींनी केली आहे.
दरम्यान तालुक्यातील नाग्यासाक्या धरणासह लहान मोठी सर्वच धरण कोरडी पडली आहेत गत १०० वर्षात एवढी भिषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने सर्वञ पाण्याची बोंबाबोंब होत आहे नांदगाव शहराला व ग्रमीण भागाला होणारा पाणी पुरवठा अपुरा पडत आहे तसेच ग्रामीण भागातिल गावे वड्या वस्ती यांना ४० टँकरने माणीकपुंज धरणातुन पाणी पुरवठा होत आहे तरी ते पाणी पुरेसे नाही. तेव्हा वन्य प्राण्याना पिण्याचे पाणी व चारा यांचा ताळमेळ बसत नाही रानात गवत आणी पाणी उरलेच नाही ज्या तळ्यावर पाणी पडते तेथे वन्यप्राणी पाण्यासाठी तुटून पडतात सध्या तिव्र उन्हाने काही ठिकाणी मोराचा मृत्यु झाल्याची वार्ता आहे तसेच मोकाट कुञ्यानी मोर, हरीण यांच्या वर हल्ला केल्याचे घटना वारंवार घडत आहे तसेच पाण्याच्या शोधात रस्ता अपघातात मोरांचा मृत्यु झाला आहे तर आता हरीण थेट चारा व पाण्याच्या शोधात नागरी वस्तीत येत आहे शेळ्या मेंढ्याच्या कळपाप्रमाणे हरीण मानवी वस्तीत आढळतात पूर्वी राञीच्या वेळी मानवी वस्तीत येणारे हरीण दिवसा मानवी वस्तीत आढळतात लोक आपल्या परीने त्यांना भांड्यात, बादलीत पाणी ठेवतात पण हराणांच्या कळपात भांडे लहान पडते आणी पाणी वाया जाते त्यासाठी सिमेंट कुंडीची गरज आहे.
सध्या नांदगाव शहरा नजीक हनुमान टेकडी, भारती सदन, सुगंधा फॅक्टरी ,माऊली हाॅटेल, गुरुकुल सोसायटी कोकणवाडा,आदी भागात हरणांचा व वन्यप्राण्याचा वावर वारंवार आढळतो आहे यामुळे मोकाट कुञ्यांचा त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. त्यासाठी वन्यप्राण्याच्या पाणवठ्यावर नियमित पाणी भरण्याची गरज आहे यासाठी वनविभागाने व स्वयसेवी संघटनांनी यासाठी प्रयत्न करावे.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.