loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास कांदे यांचे आरोप साफ चुकीचे; विजय पाटील, रतन हलवर यांचे उत्तर

May 9, 2024

मालेगाव,नांदगाव,मनमाड, दि.९ मे :- दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचा प्रचार करत असल्याचे आरोप आमदार सुहास कांदे यांनी प्रचार सभेत केले आहे. आमदार सुहास कांदे यांनी केलेले आरोप हे साफ चुकीचे असल्याचे उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील व रतन हलवर यांनी केले आहे.

महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती पवार यांच्या प्रचारार्थ नांदगाव येथे झालेल्या प्रचार सभेत आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचा प्रचार करत असल्याचे आरोप केले. या आरोपाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील व रतन हलवर यांनी खंडन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हा महायुतीतील महत्वाचा घटक पक्ष आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीचा धर्म पाळून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहे. त्यामुळे आमदार सुहास कांदे यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे कि, महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नांदगाव मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने प्रचारात सहभागी होऊन त्यांच्या विजयासाठी काम करत आहे. मात्र राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ यांना नाहक बदनाम करण्यासाठी आमदार सुहास कांदे यांचे हे षड्यंत्र आहे. नांदगाव मतदारसंघातील लोकांची दिशाभूल करण्यासाठी ते चुकीचा प्रचार करत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते डॉ.भारती पवार यांच्या प्रचारार्थ सुरु असलेल्या सभा आणि प्रचार दौऱ्यात बहुसंख्येने सहभागी होत असून महायुतीचा धर्माचे पालन करत आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
.