loader image

बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

May 12, 2024


 

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊसाचे बे मोसमी आगमन राञी झाल्याने अनेक ठिकाणी झाडे मोडून पडली विजेचे खांब कोसळले त्यामुळे विजपुरवठा तब्बल १२ तास खंडीत झाला होता
शहरात सुमारे एक तास वादळ वारा आणी पाऊस झाला. दि १२ रोजी दिवसभर प्रचंड उकाडा होता त्यानंतर राञी १०:३० वाजता प्रचंड वादळासह पावसाचे आगमन झाले घोंगावनारा वारा सोबत गारा देखील होत्या या हिम वर्षामुळे लोक प्रचंड घाबरुन गेले सर्वच बाजूनी घोंगावनारा वारा आणी पाऊस या मुळे घराघरात दरवाजा व खिडकीच्या फटीतुन पाणी घुसले आणी त्यावेळेला बत्ती देखील गुल झाली मे महिण्यात झालेल्या पावसाने गारवा निर्माण झाला तसेच जनावरांना काही प्रमाणात थोड्याच दिवसात हिरवे गवत रानात मिळू शकते तसेच संपुर्ण तालुक्यात पावसाचा बेमोसमी वर्षाव झाल्याने वन्यप्राण्याचा काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल उन्हाची तीव्रता कमी होईल या वादळामुळे जनावरांचे शेड कांद्याचे शेड उडुन फाटुन नुकासानीची शक्यता वर्तविली जाते वीज पडून नुकसान होण्याचे शक्यताआहे ? माञ गत महिण्यापासुन उन प्रचंड उकाडा असल्याने झालेल्या पावसाने सर्वञ गारवा निमर्माण झाला अाहे तसेच छोट्या मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे फळबागांचे देखिल नुकसान वर्तविले जात आहे .
दरम्यान राञी च्या पावसाने गारा वारा वादळाने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तसेच घरा घरात पाणी घुसल्याने गृहिनीणा राञी घरात घुसलेले पावसाचे पाणी उपसण्याची वेळ आली त्यामुळे संताप देखील व्यक्त झाला पण पावसाची गरज असल्याचे जानकारानी व्यक्त केले एकंदरीत हा पाऊस तालुक्यात सर्वञ असल्याच्या वार्ता होत्या. नांदगाव शहरात स्टेशन रोडवर १२५ वर्षाचे जुने निंबाचे झाड राञी मोडून रोडवर आडवे पडले सुदैवानी प्राण हाणी झाली नाही .पण स्थानीकानी दिवस उघताच झाडाच्या लहान मोठ्या फांड्या तोडून रस्ता मोकळा केला व तोडून लाकडे जळनासाठी घेऊन गेले आजुन मोठे खोड पडून आहे दुपारचे बारा वाजले तरी रस्त्यावरचे खोड न हट्वील्याने मोठ्या वाहनाना वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे तसेच साकोरा रोडवर देखील ठिकठिकाणी झाले मोडून पडली, आंब्याच्या,डाळीबांच्या बागा ऊस. शेवगा ,इतर फळझाडे व शेताच्या बांदावरील व रस्त्यावरीला आनेक झाडे वादळवार्यात मोडून पडली एकंदरीत हा पाऊस नुकसान दायक ठरला माञ या पावसाने शेतावरील विहिरीना काही प्रमाणात पाणी पाझरेल असा विश्वास व्यक्त झाला.दरम्यान झालेल्या वादळाने तालुक्यात आनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीज खंडीत झाली त्यामुळे १२ तास वीज खंडित होती तसेच भ्रमण ध्वनी देखील बंद पडले होते दि १२ मेच्या दुपार पर्यंत भ्रमण ध्वनी सेवा बंद होती .
झालेल्या पावसाने ग्रामीण भागात नदी नाल्यांना पाणी साठले लहना मोठ्या बंधार्यात पाणी आले साकोरा मोरखडी बंधार्यात ३०% पाणी साचले माणीकपुंज धरणाच्या पाण्यात थोडी वाढ झाली शाकंबरी नदीवर फुलेनगर क्रांतीनगर भागात पाणी साचले त्यामुळे विहीरीना काही प्रमाणात पाणी उतरले या पावसाने काही प्रमाणात पाण्याची समस्या तीव्रता कामी होईल आनेक शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत होते त्या प्रमाणे झालेला पाऊस समाधान कारक होता.पाण्यावाचुन जंगलातील वन्यप्राणी तडफडत होते त्यांची पाण्याची तिव्रात देखील कमी झाली तसेच जनावरांच्या पाण्याची चिंता कमी झाली .१०२ मिमी पाऊस. नांदगाव शहरात दि ११ रोजी झालेल्या पर्यन्यवृष्टीने १०२ मिमी एवढा पाऊस झाल्याची नोंद झाली असून तालुक्यात मनमाड ५ मि मी, जातेगांव ५ मि मी, हिसवळ बु!! २ मि मी,वेहळगांव १४ मिमी एवढी नोंद झालीबासल्याची माहिती नायब तहसीलदार चेतन कोणकर यांनी दिली.


अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यात आली.

के आर टी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. मुख्याध्यापक...

read more
केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम  स्वच्छता प्रेमी नागरिक, राबणारे सफाई कामगारच यशाचे खरे हीरो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम स्वच्छता प्रेमी नागरिक, राबणारे सफाई कामगारच यशाचे खरे हीरो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  राज्यातील नागरिकांचे केले अभिनंदन, स्वच्छतेत सातत्य राखण्याचे आवाहन केंद्र सरकारच्या स्वच्छ...

read more
गुड शेफर्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

गुड शेफर्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलमध्ये स्वराज्याची जणनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती व...

read more
🛑 फलक रेखाटन                                       दि. १२ जानेवारी २०२४.      युवा दिन ,स्वामी विवेकानंद जयंती, व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती.

🛑 फलक रेखाटन दि. १२ जानेवारी २०२४. युवा दिन ,स्वामी विवेकानंद जयंती, व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती.

फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! - देव हिरे. ( कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर, संचालित नूतन माध्यमिक...

read more
रेल्वे ओव्हर ब्रीज शेजारी एक नवीन फ्लाय ओव्हर ब्रीज बनवा मनमाड रेल्वे कारखान्याच्या शिष्टमंडळातर्फे आ. कांदे यांना निवेदन

रेल्वे ओव्हर ब्रीज शेजारी एक नवीन फ्लाय ओव्हर ब्रीज बनवा मनमाड रेल्वे कारखान्याच्या शिष्टमंडळातर्फे आ. कांदे यांना निवेदन

नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांची ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन...

read more
.