लोकशाहीच्या महोत्सवात आनंद सेवा केंद्राने ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क सुलभपणे बजावता यावा यासाठी ७ व्हीलचेअर ची सेवा निवडणूक आयोगाला दिली. आनंद सेवा केंद्राचे काम हे कोतुकास्पद असुन त्यांच्याकडूनच अनेकांनी प्रेरणा घ्यावी असे गौरवोद्गार मनमाड निवडणूक प्रमुख व मुख्याधिकारी श्री शेषराव चौधरी यांनी काढले. सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन व फलकाव्दारे जनजागृती टिम केट, व्यापारी महासंघातर्फे करण्यात आले.याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारीक,आनंद सेवा केंद्राचे अध्यक्ष
व टिम केटचे महाराष्ट्र सचिव कल्पेश बेदमुथा, ज्येष्ठ व्यापारी गुरूदिपसिंग कांत, आनंद सेवा केंद्राचे उपाध्यक्ष योगेश भंडारी, दिपक शर्मा,अमोल देव, अँड संजय गांधी, विशाल लुणावत,सचिन बेदमुथा,महासंघाचे उपाध्यक्ष कुलदीपसिंग चोटमुरादी, महासंघाचे सरचिटणीस मनोज जंगम,झुजर भारमल,नितीन आहेरराव,विनय सोनवणे, आर्की.हार्दीक बेदमुथा,अंकुर लुणावत,अनुप पांडे, प्रमोद भाबड, ऋषभ शाह, योगेश भडके,नितीन महाजन,गौरव केकाण,हिरामण सोनवणे, एकनाथ पवार आदी उपस्थित होते.
अझहर शेख व नानाभाऊ पाटील यांनी निवडणूक आयोग व मनमाड नगर परिषद तर्फे आनंद सेवा केंद्र व व्यापारी महासंघ,टिम केटचे आभार मानले.