loader image

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना नगरपरिषदेतर्फे सुखसुविधा

May 20, 2024




मनमाड : सध्या लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया ही पार पडत असताना सकाळपासूनच उन्हाचे चटके लागत आहे. मात्र मतदारांना उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी कोणतीही उपयोजना मनमाड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणूक आयोगामार्फत केली नव्हती. मात्र याची तत्काळ दखल घेत मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक तसेच निवडणूक अधिकारी शेषराव चौधरी यांनी तात्काळ दखल घेऊन उन्हापासून मतदारांना संरक्षण मिळावे यासाठी मंडप टाकले. तसेच मनमाड शहरातील  बुथ क्रमांक 214 व 215 सह एकूण 59 बूथ वर पिण्याच्या पाण्याची सोय, पिण्याची पाण्याची देखील व्यवस्था केली. तसेच शहरातील इतर ठिकाणी सावली व पाण्याचा प्रश्न निर्माण झाला तात्काळ मंडप पाणी आणि विकलांगाना लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिले. तसेच मनमाड नगरपरीषदेच्या वतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना चहा, नाष्टा आणि भोजनाची व्यवस्था देखील केली. त्यामुळे जनसामान्यांमध्ये प्रशासनाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


अजून बातम्या वाचा..

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिसरा टप्पा लोकार्पण सोहळा ना. दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिसरा टप्पा लोकार्पण सोहळा ना. दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग आहे....

read more
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मृतकच्या परिवाराला मिळाली ४० लाखांची अपघात नुकसान भरपाई….

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मृतकच्या परिवाराला मिळाली ४० लाखांची अपघात नुकसान भरपाई….

मनमाड : नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये अनेक...

read more
.