मनमाड : सध्या लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया ही पार पडत असताना सकाळपासूनच उन्हाचे चटके लागत आहे. मात्र मतदारांना उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी कोणतीही उपयोजना मनमाड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणूक आयोगामार्फत केली नव्हती. मात्र याची तत्काळ दखल घेत मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक तसेच निवडणूक अधिकारी शेषराव चौधरी यांनी तात्काळ दखल घेऊन उन्हापासून मतदारांना संरक्षण मिळावे यासाठी मंडप टाकले. तसेच मनमाड शहरातील बुथ क्रमांक 214 व 215 सह एकूण 59 बूथ वर पिण्याच्या पाण्याची सोय, पिण्याची पाण्याची देखील व्यवस्था केली. तसेच शहरातील इतर ठिकाणी सावली व पाण्याचा प्रश्न निर्माण झाला तात्काळ मंडप पाणी आणि विकलांगाना लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिले. तसेच मनमाड नगरपरीषदेच्या वतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना चहा, नाष्टा आणि भोजनाची व्यवस्था देखील केली. त्यामुळे जनसामान्यांमध्ये प्रशासनाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


