चित्रपटांमध्ये दाखविलेले विविध चोरीच्या शकली आता प्रत्यक्षात चोरटे अवलंबित असून असाच एक चालत्या ट्रक मधून माल चोरतांनाचा प्रकार मुंबई आग्रा महामार्गावर घडला आहे.धूम हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. यामध्ये दुचाकी चोरांची टोळी अतिशय हुशारीने मोठ्या चोरी करताना दिसत आहे. यामध्ये चोरटे आपल्या चतुराईने व धूर्तपणे लुटलेला माल घेऊन पोलिसांपासून दूर पळून जातात. या चित्रपटात जगभरातील धोकादायक बाइक स्टंटही दाखवण्यात आले आहेत. पण अलीकडे खऱ्या आयुष्यातही काही चोरटे प्रकाशझोतात आले आहेत जे स्टंट करताना जीव धोक्यात घालून चोरी करताना दिसतात. आम्ही तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ एक महिना जुना आहे, पण तो सध्या व्हायरल होत आहे
.