मनमाड येथील छत्रे न्यु इंग्लिश स्कुल चा इयत्ता दहावीचा निकाल 98.85 टक्के लागला असून सर्वात जास्त विद्यार्थी परीक्षेला बसवून उल्लेखनीय व चांगला निकाल लागल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. शाळेत श्रावणी वाल्मिक सोनार ही विद्यार्थिनी 95 टक्के गुण मिळवून पहिली, कावेरी दीपक कडनोर 94.60 दुसरी तर समर्थ गंगाधर घुगे 94 टक्के मिळवून तिसरा आला आहे.या शिवाय गौरी गणेश पवार 92 टक्के व वेदिका संतोष सोनवणे 91.60 यांनी पहिल्या पाच क्रमांकात स्थान मिळवले आहे. शाळेचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर सर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर ,सचिव दिनेश धारवाडकर,संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, बी एस कुलकर्णी, मुख्याध्यापक आर एन थोरात,उपमुख्यध्यापक संदीप देशपांडे, वरिष्ठ पर्यवेक्षक प्रवीण व्यवहारे, पर्यवेक्षिका संगीता पोतदार ,वर्गशिक्षक सौ व्ही व्ही चांदवडकर, एम सी वाणी ,डी टी भामरे व सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.