जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर बस दरीत कोसळली.जम्मू-काश्मीरमध्ये तीर्थक्षेत्रावरुन येणाऱ्या भाविकांच्या बसवर संशयित दहशतवाद्यांना गोळीबार केल्याची घटना समोर आली हे. या दहशतवादी हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर बस दरीत कोसळली आहे.बस भाविकांना घेऊन शिव खोडी मंदिरात निघाली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी या बसवर गोळीबार केला.घटनेची माहिती मिळताच, स्थानि प्रशासन, लष्कर, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. बस दरीत कोसळल्याने मृतदेह देखील विखुरले गेले आहे. स्थानिक लोक देखील बचाव कार्यात मदत करताना दिसत आहेत. बस दरीत कोसळल्याने बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत.
भाविकांना घेऊन जाणारी ही बस शिव खोडी मंदिर येथे निघाली होती. त्यावेळी काही दहशतवादी पोनी परिसरातील तेरयाथ गावाजवळ दबा धरुन बसले होते. अचानक या दहशतवाद्यांनी बसवर हा हल्ला झाला. त्यामुळे बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस दरीत कोसळली.
बचावकार्य पूर्ण करण्यात आलं आहे. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जण जखमी आहेत. जखमीवर जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यात्रेकरुंची ओळख पटलेली नसून प्राथमिक माहितीनुसार सर्वजण उत्तर प्रदेशातील आहेत, असं मोहिती शर्मा यांनी सांगितलं.













